

Microsoft investment Mumbai Devendra Fadnavis announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मायक्रॉसॉफ्ट मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती आज (दि. १२ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी मायक्रोसॉफ्टचा हा प्रोजेक्ट मुंबईत होणार असून यातून जवळपास १५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं देखील सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या मायक्रोसॉफ्ट AI टूर या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्या नाडेला यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून कशा प्रकारे क्राईम कंट्रोल करू शकतो.याचं महाराष्ट्रानं उदारहण तयार केलं आहे. हा प्रोजेक्ट मायक्रोसॉफ्ट सोबत करण्यात आला होता. तो आम्ही सत्या नडेलायांच्यासमोर शोकेस केला.'
फडणवीस पुढे म्हणाले, 'सत्या नाडेला यांच्यासोबत आमची वन ऑन वन मिटिंग झाली. राज्यातील इतर क्षेत्रात देखील AI चा कसा वापर करता येईल. यासाठी माहाराष्ट्रासोबत सर्व्हिस, हेल्थकेअर, शिक्षण, कृषी या प्रत्येक क्षेत्रामध्ये AI को पायलट कसे तयार तरता येतील यावर चर्चा झाली.'
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंतची सर्वात मोठी मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक जाहीर केली आहे.या गुंतवणुकीत आपण महाराष्ट्राचा विचार करावा अशी विनंती करण्यात आली होती. मोदींनीही मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीत महाराष्ट्र देखील प्रामुख्यानं असणार आहे असं सांगितलं.
फडणवसींनी, आतासुद्धा मायक्रोसॉफ्टची मोठी गुंतवणूक महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्राला AI हब करण्यासाठी मायक्रॉसॉफ्ट पुढाकार घेईल. याबाबतची मायक्रोसॉफ्ट सोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं.