Indigo Flight Cancelled Pudhari
राष्ट्रीय

Flight Cancelled: इंडिगोची फ्लाइट रद्द! नवविवाहित जोडप्याने स्वतःच्या रिसेप्शनला लावली ऑनलाइन हजेरी, व्हिडिओ व्हायरल

Flight Cancelled, Reception Goes Virtual: इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे नवविवाहित जोडप्याला स्वतःच्या रिसेप्शनला प्रत्यक्ष येणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी कार्यक्रम ऑनलाइन अटेंड केला.

Rahul Shelke

Indigo Flight Cancelled Travel Chaos 2025: कर्नाटकमधील हुबळी शहरात वेगळीच घटना घडली आहे. नवविवाहित जोडप्याला स्वतःच्याच रिसेप्शनला प्रत्यक्ष येणं शक्य नसल्याने त्यांनी ऑनलाइन हजेरी लावली. इंडिगोच्या अनेक फ्लाइट रद्द झाल्यामुळे जोडप्याने हा निर्णय घेतला.

हुबळीतील मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वरचे संगम दास, दोघेही बेंगळुरूमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, 23 नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर येथे दोघांनी लग्न केले. यानंतर 3 डिसेंबर रोजी हुबळीतील गुजरात भवन येथे रिसेप्शन ठेवण्यात आले होते.

तिकिटे आधीच बुक केली होती, मात्र...

जोडप्याने भुवनेश्वर–बेंगळुरू–हुबळी असा प्रवास करण्यासाठी 2 डिसेंबरची तिकिटे आधीच बुक केली होती. मात्र, इंडिगोचे पायलट नसल्यामुळे देशभरातील फ्लाइट्स रद्द होत आहेत. त्यांची फ्लाइटला उशीर होत होता आणि शेवटी 3 डिसेंबरच्या पहाटे ती फ्लाइट रद्द करण्यात आली. लांबून येणाऱ्या नातेवाईकांच्या फ्लाइट्सही रद्द झाल्या होत्या.

जोडप्यांच्या अनुपस्थित रिसेप्शन सुरू…

रिसेप्शनची सर्व तयारी पूर्ण झाली होती, नातेवाईक हॉलमध्ये जमा झाले होते. त्यामुळे कार्यक्रम रद्द करणे शक्य नव्हता. अशा परिस्थितीत, वधू–वराच्या जागी वधूचे आई–वडील विधींसाठी बसले, तर मेधा आणि संगम यांनी भुवनेश्वरमधून व्हिडिओ कॉलद्वारे रिसेप्शनला हजेरी लावली.

वधूच्या आईने सांगितले “आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली, पण अचानक फ्लाइट रद्द झाल्याने मुलांना येणे शक्य नव्हते. नातेवाईकांना बोलावले होते, त्यामुळे कार्यक्रम थांबवणे शक्य नव्हते. त्यामुळे रिसेप्शनला त्यांनी ऑनलाइन हजेरी लावली.”

एकाच दिवशी 500 फ्लाइट्स रद्द

या आठवड्यात इंडिगोने संपूर्ण देशात शेकडो फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. दिल्ली, जयपूर, मुंबई, भोपाळ, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई अशा प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. गुरुवारी एअरलाइनने एकाच दिवशी 500 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोच्या 20 वर्षांच्या इतिहासात अशी घटना कधीही घडली नव्हती.

DGCA ला दिलेल्या अहवालात इंडिगोने सांगितले—

  • खराब नियोजनमुळे ही समस्या निर्माण झाली

  • 8 डिसेंबरपर्यंत आणखी फ्लाइट्स रद्द होतील

  • अनेक सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत

  • 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑपरेशन्स पूर्णपणे सुरुळीत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT