India GDP fourth largest economy Pudhari
राष्ट्रीय

India fourth largest economy: जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानी; 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला

India fourth largest economy: ; नीती आयोगाची माहिती; 2.5 वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता; अमेरिका, चीन, जर्मनी पहिल्या तीन क्रमांकावर

Akshay Nirmale

India $4 trillion economy overtakes Japan GDP NITI Ayog IMF economy ranking

नवी दिल्ली : IMF च्या आकडेवारीनुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा इतिहास रचला आहे. भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलरच्या म्हणजेच सुमारे ३३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आता भारताचा तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा मार्ग तयार झाला आहे.

याबाबतची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिली. देशांतर्गत आर्थिक सुधारणांमुळे आणि जागतिक उत्पादन साखळीमध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेमुळे देशाचे जागतिक अर्थव्यवस्थेत स्थान मजबूत होत आहे.

पुढील 2.5 ते 3 वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो

शनिवारी नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “आपण आता चौथ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. आपल्या पुढे आता अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश आहेत.”

सुब्रह्मण्यम म्हणाले, “आपण सध्याच्या धोरणांना चालना दिली, तर पुढील 2.5 ते 3 वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो.”

ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका वाढतेय

जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख आता अधिक दृढ होत आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि इतर औद्योगिक धोरणांमुळे भारत परकीय गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरतो आहे. चीनच्या तुलनेत भारत कमी खर्चिक, कुशल मनुष्यबळ असलेले उत्पादन केंद्र बनत आहे.

भारत उत्पादन केंद्र म्हणून आकर्षण ठरत राहील

सुब्रह्मण्यम यांनी यावेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यावर उत्तर दिले. ट्रम्प यांनी अलीकडे म्हटले होते की, आयफोनसारखी उत्पादने भारतासारख्या देशांमध्ये बनवण्याऐवजी अमेरिकेतच बनवली पाहिजेत.

यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं, “भविष्यात अमेरिका कोणते टॅरिफ लावते हे स्पष्ट नाही. मात्र भारत हा कमी खर्चिक उत्पादन केंद्र म्हणून आकर्षण ठरत राहील.”

ऑगस्टमध्ये मालमत्ता मोनेटायझेशनचा दुसरा टप्पा

सरकार आता दुसऱ्या टप्प्यातील मालमत्ता मोनेटायझेशन कार्यक्रमासाठी तयारी करत आहे. ऑगस्ट 2025 मध्ये हा कार्यक्रम सुरू होणार असल्याची माहितीही सुब्रह्मण्यम यांनी दिली. यातून सार्वजनिक मालमत्तेचा योग्य वापर करून सरकार महसूल निर्माण करणार आहे.

ही घडामोड केवळ आर्थिकच नाही, तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. आगामी काळात भारत अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सज्ज होत आहे. यामुळे देशाच्या जागतिक पातळीवरील स्थानात मोठी भर पडेल.

टॉप 3 देशांचा जीडीपी किती आहे?

2024 सालच्या अंदाजानुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीचा जीडीपी 4.7 ट्रिलियन डॉलर इतका आहे. 2025 मध्ये यात 1 टक्का वाढ अपेक्षित आहे.

जगात दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा जीडीपी 18 ट्रिलियन डॉलर इतका आहे. चीनच्या आर्थिक वाढीचा दर 5 टक्के इतका आहे.

तर अमेरिका जगातील आर्थिक महासत्ता असून अमेरिकेचा जीडीपी तब्बल 30 ट्रिलियन डॉलर इतका आहे आणि अमेरिकेतील आर्थिक वाढीचा दर 2.8 टक्के इतका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT