पाकिस्‍तानवर कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट File Photo
राष्ट्रीय

पाकिस्‍तानवरील कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट...पंतप्रधान मोदी आज घेणार ४ महत्‍वाच्या बैठका

पंतप्रधान मोदींच्या CCS, CCPA बैठकीत पाकिस्‍तानवरील कारवाईवर होणार शिक्‍कामोर्तब

निलेश पोतदार

Indian army has got free hand to take action against pakistan pm narendra modi

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यातील दहशतवाद्यांवर लवकरच भारताकडून मोठी कारवाई करण्यात येणार आहे. भारताने दहशतवादी आणि दहशतवाद दोघांनाही मुळासकट उखडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने सैन्याला दहशतवाद्यांवर कारवाईसाठी पूर्ण स्‍वातंत्र्य बहाल केले आहे.

या सर्व कारवाईंवर आज शिक्‍कामोर्तब करण्याची आता वेळ आल्‍याचे दिसून येत आहे. आज बुधवार पंतप्रधान मोदी यांच्या ४ महत्‍वाच्या बैठका पार पडणार आहेत. या बैठका पाकिस्‍तानवरील कारवाईच्या दृष्‍टीने महत्‍वाच्या मानल्‍या जात आहेत. त्‍यामुळे या बैठकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

आज कॅबीनेटची बैठक होणार

पंप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सर्वात पहिला कॅबिनेट सुरक्षा कमटी (CCS) ची बैठक होणार आहे. त्‍यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CCPA (Cabinet Committee on Political Affairs) ची महत्‍वाची बैठक होणार आहे. तीसरी महत्‍वाची बैठक आर्थिक बाबींसंदर्भात (CCEA) ची होणार आहे. त्‍यानंतर शेवटी कॅबीनेटची बैठक होणार आहे. पहलगाम हल्‍ल्‍यानंतर ही कॅबीनेटची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीमध्येच या सर्व प्रस्‍ताव आणि निर्णयांवर शिक्‍कामोर्तब होणार आहे. ज्‍यावर दिर्घ चर्चेनंतर निर्णय होईल.

आजचा दिवस महत्‍वाचा

पाकिस्‍तानवर कारवाईच्या निर्णयासाठी आजचा महत्‍वाचा दिवस असणार आहे. या बैठकींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्‍ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी, आरोग्‍य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य काही सदस्‍यही सहभागी होणार आहेत.

सैन्याला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य

मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसए अजित डोभाल, सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत दीड तास उच्चस्तरीय बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईसाठी तिन्ही सैन्यांना मोकळीक दिली आहे. तिन्ही सैन्ये देशाच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतात. याचा अर्थ असा की आता दहशतवाद्यांशी आणि त्यांच्या मालकांविरुद्ध निर्णायक लढाईची वेळ आली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत काय करेल याचे संकेत आधीच दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी संरक्षणमंत्र्यांशीही दीर्घ चर्चा केली.

सोमवारी पंतप्रधान मोदींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दीर्घ चर्चा केली. राजनाथ यांनी लष्करप्रमुखांकडून पहलगामबद्दल अपडेट घेतले होते आणि पंतप्रधानांना माहिती देण्यासाठी गेले होते. पहलगामची सर्व माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी २३ एप्रिल रोजी झालेल्या सीसीएस बैठकीत आवश्यक सूचनाही दिल्या होत्या.

आज कारवाईवर अंतिम शिक्कामोर्तब होईल

या बैठकांमध्ये पाकिस्तानबाबतची रणनीती अंतिम केली जाऊ शकते, असे मानले जाते. पंतप्रधान मोदींनी आधीच याचे संकेत दिले आहेत. २४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आता आली आहे.

भारतीय सैन्य ठरवणार कारवाईची दिवस आणि वेळ

मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या उच्चस्तरीय बैठकीतून जे काही निष्पन्न झाले, त्यावरून हे स्पष्ट झाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींची उलटी गिनती सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींनी देशाच्या शत्रूंविरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली आहे. याचा अर्थ असा की आता सैन्य ठरवेल - हल्ल्याची वेळ काय असेल, तारीख काय असेल आणि कार्यवाही काय असेल.

निर्णायक लढाईसाठी तिन्ही सैन्यांना मोकळीक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईसाठी तिन्ही सैन्यांना मोकळीक दिली आहे. तिन्ही सैन्ये देशाच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतात.

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केला. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. सुमारे १६ पर्यटक जखमी झाले. हल्ल्यानंतर, २३ एप्रिल रोजी सीसीएस बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध राजनैतिक हल्ला केला. अशा परिस्थितीत, बुधवारी होणाऱ्या मोठ्या बैठकांमध्ये कोणती मोठी कारवाई जाहीर केली जाऊ शकते याबद्दल अटकळ बांधली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT