

पुढारी ऑनलाईन डेस्क
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी सर्वंच पातळयांवर पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. आंतराष्ट्रीय स्तरावरदेखील पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे. भारताकडून उचललेले सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे सिंधू पाणी वाटप कराराला दिलेली स्थगिती. हा करार रद्द होत असल्याने पाकीस्तानची जनता पाण्यासाठी अक्षरक्षः तडफडणार आहे. त्यामुळ पाकिस्तानच्या पोटात खड्डा पडला आहे. त्यांचे नेते भरकटल्यासारखी विधाने करत आहेत. आता पाकिस्तानचे विदेश मंत्री व उप - पंतप्रधान इशाक डार यांनी सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यास भाराताविरुद्ध युद्ध अटळ असल्याची पोकळ धमकी दिली आहे.
पाकिस्तानातील माध्यमांच्यानुसार पाकिस्तानमधील संसदेत भाषण करताना डार यांनी हे वक्तव्य केले. सिंधुच्या पाण्याबाबत काही छेड छाड झाल्यास युद्ध अटळ आहे. इशाक यांच्या वक्तव्यामध्ये चांगलीच भिती दिसून आली. ते म्हणाले सिंधु करार म्हणजे २४ कोटी जनतेच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा करार पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे. पाकिस्तानातील मोठी लोकसंख्या या सिंधु नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा करार रद्द झाल्यास आम्ही भारताबरोबर युद्ध करु, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
पुढे त्यांनी बोलताना पहलगाम हल्ल्यापाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट शब्दात नाकारले, पंतप्रधान शहबाज शफिफ यांच्या द्वारे याची स्वतंत्र चौकशी केली जाईल. सौदी अरब, युएई व चिन तुर्की आदी देशांशी बोलून आम्ही पाकिस्तानची बाजू मांडली आहे.
भारत आपले नेरेटीव्ह तयार करण्यात पूर्णतः अपयशी ठरला आहे असा हास्यास्पद दावाही डार यांनी केला आहे. या हल्ल्यापाठीमागे पाकिस्तानचा हात नाही असा दावा केला आहे. या हल्ल्याच्या पाठीमागे पाकिस्तान असल्याचा संशय भारताकडून निर्माण केला जात आहे. यात आमचा कोणताही हात नाही याचा पुनुरुच्चारही त्यांनी केला.