राष्ट्रीय

India Ships Hormuz : भारताच्या दोन LPG जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय ध्वज असलेली दोन जहाजे ग्रीन आशा आणि ग्रीन सान्वी यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. एलएसईजी आणि केप्लर या तेल बाजार विश्लेषक संस्थेने ही माहिती दिली.

ग्रीन आशा आणि ग्रीन सान्वी यांनी आखाती क्षेत्र ओलांडले असून त्या पूर्व होर्मुझच्या सामुद्रधुनीत आहेत, असे जहाज प्रवासाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. यामुळे या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय ध्वज असलेल्या एलपीजीवाहक जहाजांची संख्या आठवर गेली आहे.

शिवालिक, नंदादेवी, पाईन गॅस, जग वसंत, बीडब्ल्यू एल्म आणि बीडब्ल्यू टायर ही जहाजे आधीच भारतात पोहचली आहेत. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा एलपीजी आयातदार देश आहे. गेल्या वर्षी भारताने 3.315 कोटी टन एलपीजीचा वापर केला. यातील 60 टक्के मागणी आयातीद्वारे पूर्ण झाली. या आयातीपैकी सुमारे 90 टक्के आयात मध्य पूर्वेकडून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT