India Russia Oil Deal Pudhari
राष्ट्रीय

India Russia Oil Deal: रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी; युद्धामुळे भारताची रणनीती बदलली

एप्रिल महिन्यात होणार पुरवठा, १५ डॉलरपर्यंत अधिक रक्कम मोजली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली आहे. एप्रिल महिन्यात या तेलाचा पुरवठा होणार आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असल्याने होर्मूझच्या सामुद्रधुनीतील जल वाहतूठ ठप्प झाली आहे. त्यामुळे देशाला होणारा तेल पुरवठा आटला आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीसाठी ३० दिवसांची मुभा दिली आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ही मुदत संपणार आहे. त्यामुळे भारताने रशियन तेलाची खरेदी वाढविली आहे.

मात्र, वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रशियाने ब्रेंट क्रूडच्या तुलनेत ५ ते १५ डॉलर अधिक आकारण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी भारताला सवलतीच्या दरात तेल देण्यात येत होते.

केप्लर या तेल बाजार अभ्यासक संस्थेच्या मते चालू महिन्याप्रमाणेच एप्रिलमध्ये रशियन तेल येईल. मात्र, फेब्रुवारीच्या तुलनेत दुप्पटीने रशियन तेल भारतात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT