पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा सामना गुरूवारी (दि.८) रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र, भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून ड्रोन हल्ला करून ते स्टेडियम जमीनदोस्त केले. त्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) पाकिस्तान सुपर लीग (PSL) चे सामने दुबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रावळपिंडीतील ड्रोन हल्ल्यामुळे परदेशी खेळाडूंना धक्का बसला आहे. एका वृतवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अनेक खेळाडूंनी ही स्पर्धा सोडून त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
२२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगामनजीकच्या बैसरन येथे पर्यटकांवर धर्म विचारून गोळा झाडल्या होत्या. यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक करत ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. यामध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियमवर 'पाकिस्तान सुपर लीग' (PSL) चा सामना गुरूवारी होणार होता. मात्र, भारताने ड्रोन हल्ला करत हे स्टेडियम जमीनदोस्त केले. त्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) पुढील सामने पाकिस्तानात न घेता हे सामने हे सामने दुबईला घेण्याचा निर्णय घेतला आहे.