

अमेरिकेचे उपराष्ट्रपति जेडी वेन्स यांनी असे म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान संघर्ष हा मूलभूतपणे आमचा विषय नाही आणि तो नियंत्रित करण्याचा अमेरिकेच्या क्षमतेशी त्याचा काहीही संबंध नाही'. अमेरिका भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही कारण ते आमचे काम नाही. या लोकांना तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आम्ही राजनैतिक मार्गांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. आमची आशा आणि अपेक्षा अशी आहे की, हे एका व्यापक प्रादेशिक युद्धात किंवा आण्विक संघर्षात रूपांतरित होणार नाही. सध्या, आम्हाला असे वाटत नाही की ते घडेल.
पाकिस्तानकडून हल्ल्याची शक्यता असल्याने जम्मू भागात पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणात सायरनही वाजवण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये भारताने 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. BSF ने ही कारवाई केली असून घुसघोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा यामध्ये करण्यात आला आहे.
भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आहे. पाकिस्तानच्या नारोवाल सेक्टरमध्ये भारतीय सैन्याकडून हल्ला करण्यात आला आहे.
देशातील सध्याच्या सुरक्षा स्थितीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची साउथ ब्लॉकमध्ये एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये तिन्ही लष्करप्रमुख सहभागी होणार आहेत. बैठकीमध्ये सुरक्षा तयारी आणि कोणत्याही संभाव्य आव्हानासाठी रणनीती आखण्यासाठीची चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
कराची बंदरावर भारताच्या नौदलाने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. ड्रोन व मिसाईलने हे हल्ले करण्यात आले आहेत. भारत पाकिस्तान युद्धात आता नौदलाने मोर्चा सांभाळला आहे. कराची पोर्टवरील महत्वाच्या ठिकांणावर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे कराची बंदर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
पहलगाम हल्ला ज्याच्या चितावणीखोर वक्तव्यामुळे झाला तो पाकचा लष्करप्रमुख मुनीरची उचलबांगडी करण्याच्या नादात पाकिस्तान आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानची नांगी ठेचली आहे. याला कारणीभूत मुनीर असल्याची भावना पाकिस्तानची आहे.
भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला असतानाच फुटीरतावादी बलुचीस्तानच्या आर्मीने पाक लष्करावर जोरदार हल्ला केला. त्यांनी गॅस पाईपलाईन उडवून दिली आहे.
भारताकडून पाकिस्तनच्या हल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारतकाडून ऐवढ्या मोठ्या हल्ल्याची अपेक्षा नसल्याने पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजली आहे. कराची, पेशावर, इस्लामाबाद, पेशावर याठिकाणी भारताने हल्ले सुरु केले आहेत. यामुळे पाकिस्तानात अराजकता माजली आहे. पाकिस्तानची ५ फायटर विमानेही भारताने पाडली आहेत. जम्मू मध्ये अनेक ठिकाणांवर गोळीबार सुरु आहे.
भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतिल इंडिया गेट व आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील २७ विमानतळ बंद करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानकडू पुंछ जिल्हा्यात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु केला आहे. त्याला भारताकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर लेहमधील शाळांना दोन दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवाई हल्ले केल्यानंतर भारताच्या नौदलाने कराची पोर्टवर हल्ला केला आहे. आयएनएस विक्रातंने हा हल्ला केला. भारताने आता जमिनीवरुन, हवेतून व समुद्रमार्गेही पाकिस्तानवर मारा सुरु केला आहे.
नागरिक उड्डाण सुरक्षा ब्यूरो (BCAS) कडून देशातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले प्रशासनाला आहेत. विमानतळांवर प्रवाशांची 'सेकंडरी लॅडर पॉइंट' तपासणी केली जाईल. त्याचबरोबर टर्मिनल इमारतीत प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विमानाच्या आत एअर मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व विमानतळांवर प्रवाशांची तपासणी दोन ते तीन वेळा केली जाईल.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याबाबत संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, आज पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यांचे सर्व हल्ले परतवून लावण्यात आले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या जनतेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता, गुजरातमधील औद्योगिक शहर सुरतमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. अरबी समुद्राला लागून असलेल्या सुरतमधील प्रमुख औद्योगिक युनिट्स, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी सांगितले की, सुरक्षा दल पूर्ण खबरदारी घेत आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इटलीचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री अँटोनियो यांच्याशी संवाद साधला. असून "आतंकवादाविरोधात भारताने घेतलेली थेट भूमिका कारवाई यावर चर्चा झाली. कोणत्याही तणावावेळी भारताकडून ठाम प्रत्युत्तराला दिले जाईल," असे ट्वीट डॉ. जयशंकर यांनी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानबरोबर सरु झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमिवार सर्व निमलष्करी दलांच्या महासंचालकांसोबत (DG) महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि देशातील सुरक्षा स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. सीमा सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी बीएसएफच्या महासंचालकांशी संपर्क साधला आणि सीमारेषेवर हाय अलर्ट जारी करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, गृहमंत्री अमित शहा यांनी CISF चे महासंचालक आर.एस. भट्टी यांच्याशीही चर्चा केली आणि देशातील प्रमुख विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले. कोणतीही संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन CISF ला विशेष सतर्क राहण्यास सांगितले आहे.
शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये शाळा बंद राहतील. शिक्षणमंत्री सकिना इट्टू यांनी याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, शुक्रवारी बारावीपर्यंतच्या शाळांमधील वर्ग स्थगित राहतील. काश्मीर विद्यापीठ आणि इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IUST) नेही शुक्रवारचे वर्ग पुढे ढकलले आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, 'दहशतवादा विरोधातील लढ्यात भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचे मी मनापासून स्वागत करतो
प्रत्युत्तराच्या कारवाईत, भारताने लाहोरमध्ये स्थित पाकिस्तानची AWACS (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम) नष्ट केली आहे. याशिवाय, भारताने पाकिस्तानच्या फैसलाबाद, सरगोधा, मुलतान आणि सियालकोट शहरांमधील संरक्षण यंत्रणाही उद्ध्वस्त केल्या आहेत.
भारतीय लष्कराने लाहोरमधील पाकिस्तानी लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले आहेत. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत, भारतीय हवाई दलाने लाहोरमधील महत्वाच्या तळांवर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे.
भारताने प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाईत पाकिस्तानचे अत्याधुनिक एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमान पाडले आहे. ही कारवाई भारतीय हवाई दलाने सीमेजवळ केलेल्या उच्चस्तरीय हवाई संरक्षण मोहिमेचा एक भाग होती. हे विमान पाकिस्तानच्या देखरेख आणि युद्ध नियंत्रण क्षमतेचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते; ते पाडून भारताने शत्रूच्या सामरिक फायद्याचे गंभीर नुकसान केले आहे. AWACS विमान पाडल्याने पाकिस्तानच्या हवाई देखरेख आणि समन्वय यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय सैन्य घुसले असल्याची माहिती मिळत आहे. लाहोर मधुन अफरातफरी झाली असल्याची माहती समोर येत आहे. लोक आरडाओरडा करत आहेत.घाबरुन शहराच्या बाहेर पळत आहे. शहरातील विज बंद करण्यात आली आहे. लाहोरच्या मिलिट्री तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम बिनकामाची ठरली आहे.
नवी दिल्ली : आज गरुवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. दरम्यान या हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून भारताने लाहोर शहरावर ड्रोन हल्ला केल्याची माहती मिळत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा हल्ला केला आहे. पाकिस्तानने भारतावर जवळपस 60 ड्रोन हल्ले केल्याची माहिती मिळत आहे. तर विमानेही हल्ले करण्याचा प्रयत्न करत होता पण भारताच्या सुरक्ष यंत्रणांनी JF-17, F-16, त्याचबरोबर आणखी एक फायटर जेट भारताने नष्ट केली आहेत.
पाकिस्तानकडून सिमेवर अनेक ठिकाणी हल्ले सुरु केले असून आज पठाणकोट, पंजाब, राजस्थान , येथील एअरबेसवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या संरक्षणप्रणाली S - 400 यंत्रणेने ही मिसाईल हवेतच नष्ट केली. तसेच विमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तोही हाणून पाडण्यात आला.