india pakistan tensions jammu kashmir residential areas damaged army activated missile system
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताच्या सिंदूर ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चालला आहे. दोन्ही देश युद्धाच्या तोंडावर उभे आहेत आणि दोन्ही देशांचे सैन्य तयार आहे. काल (शुक्रवार) रात्री दोन्ही देशांकडून मोठे क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. भारताने पाकिस्तानच्या चार एअरबेसना लक्ष्य केले. यावेळी पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानने श्रीनगरसह सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. तसेच अनेक सीमारेषांवर दोन्ही देशांच्या सैन्यात समोरा-समोरचे युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कार्यान्वित केलेली आहे.
पाकिस्तानच्या बाजुने रात्री झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी जी दृष्ये समोर आली आहेत, त्यामध्ये जम्मू काश्मीरच्या रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात रहिवासी परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून नागरि वसाहतींना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे.
पाकिस्तानकडून होत असलेल्या सलग गोळीबारात जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये रात्री ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, जम्मू जवळील भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्यांना आणि दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅड्स नष्ट केले आहेत, जिथून ड्रोन लॉन्च केले जात आहेत.
पाकिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी ड्रोनने हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये संदिग्ध ड्रोनचा समावेश आहे. यामध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठानकोट, फाजिल्का, लालगढ, जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भूज, कुआरबेट आणि लाखी नाल्याचा समावेश आहे. एका सशस्त्र ड्रोनने फिरोजपूरमध्ये एका रहिवासी परिसराला लक्ष्य केले. ज्यानंतर एक स्थानिक कुटुंबिय जखमी झाले. जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. सुरक्षा दलांकडून तपासणी करण्यात येत आहे.
संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर सांगितले की, भारतीय सशस्त्र बलाकडून सतर्कता बाळगली जात आहे. संभाव्य हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना काउंटर-ड्रोन यंत्रणेचा उपयोग करून ट्रॅक केले जात आहे, आणि त्याला निष्प्रभ केले जात आहे. तसेच सीमावर्ती भागात कडक लक्ष्य ठेवण्यात येत आहे. तसेच जिथे धोका लक्षात येईल तीथे तात्काळ कारवाई करण्यात येत आहे.
सीमेवरील नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षा निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.