IND-PAK Tension | पाकिस्‍तानच्‍या गोळीबारात राजौरीतील अतिरिक्त उपायुक्तांचा मृत्‍यू, दोन कर्मचारी गंभीर जखमी

मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुल्‍लांनी व्‍यक्‍त केले दु:ख
IND-PAK Tension
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज 'एक्स'वर राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त राज कुमार थापा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.Photo ANI
Published on
Updated on

IND-PAK Tension

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 'एक्स' वर या घटनेची माहिती दिली.

राजाैरीतील सरकारी निवासस्‍थानात हाेते वास्‍तव्‍य 

राज कुमार थप्पा हे राजौरीतील सरकारी निवासस्‍थानी राहण्‍यास होते. गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त राजकुमार थापा आणि त्यांचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्‍यात आले. मात्र येथे त्‍यांचा मृत्यू झाला. दोन्‍ही कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.

IND-PAK Tension
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला; भारताकडून ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानमधील ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक

दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत : ओमर अब्‍दुला

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 'एक्‍स' पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "राजौरीहून आलेली वेदनादायी बातमी. आपण जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचा दौरा करत होते. मी अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते. आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करून केलेल्या गोळीबारात आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांना अधिकाऱ्याच्या निवासस्थानी प्राण गमवावे लागले," असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या भयानक जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news