Tax On Mobile Internet Data pudhari
राष्ट्रीय

Tax On Mobile Internet Data: आता मोबाईल इंटरनेट डेटावरही लागणार टॅक्स...? सरकारचा हा विभाग करणार 'स्टडी'

Anirudha Sankpal

Tax On Mobile Internet Data: भारतात येत्या काळात मोबाईल इंटरनेट वापर महाग होण्याची शक्यता आहे. सरकार मोबाईल इंटरनेट डेटावर देखील नवीन कर लावण्याच्या पर्यायाची चाचपणी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) या विभागाला याबाबत अभ्यास करण्यास सांगितलं आहे. आता हा विभाग डेटा युसेजवर कर लावणं शक्य आहे की नाही हे पाहणार आहे.

DoT करणार अभ्यास

माध्यमातील रिपोर्टनुसार नुकतेच टेलीकॉम सेक्टरच्या एका रिव्ह्यू मिटिंगमध्ये डेटा युसेजवर कर लावण्याच्या मद्द्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर DoT ला मोबाईल डेटा वापरावर कर लावता येऊ शकतो का याची तपास करा असं सांगण्यात आलं. जर कर लावता येत असेल तर त्याचं मॉडेल कसं असेल याचा देखील अभ्यास करण्यास DoT ला सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसा सरकार ज्या पर्यायाची चाचपणी करत आहे त्यात १ रूपया प्रती GB डेटावर टॅक्स लावण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर युजर मोबाईल डेटा वापरेल तसे त्यावर अतिरिक्त चार्ज लागू होईल.

तर सरकारी तिजोरीत हजारो कोटी होणार जमा

जर प्रती जीबी १ रूपयाचा टॅक्स लागू झाला तर सरकारच्या तिजोरीत प्रत्येक वर्षी जवळपास २२ हाजर ९०० कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न जमा होईल. सध्याच्या घडीला तरी हा फक्त प्रस्तावर आहे. यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

भारत हा अशा देशांमध्ये सामील आहे जिथं मोबाईल डेटा हा फारच स्वस्त आहे. स्वस्त इंटरनेटमुळं भारतात डेटाचा खप प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. व्हिडिओ स्ट्रिमिंग, सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग आणि रील्स यामुळं मोबाईल डेटाचा वापर वेगानं वाढत आहे.

मोबाईल रिचार्जवर आहे १८ टक्के जीएसटी

विशेष म्हणजे सध्याच्या घडीला प्रत्येक मोबाईल रिचार्ज आणि पोस्टपेड बीलवर १८ टक्के जीएसटी लावला जात आहे. जर युजर्स आधीच टेलीकॉम सर्व्हिससाठी कर देत असेल तर भविष्यात डेटावर देखील कर लागला तर तो एक अतिरिक्त कर असेल.

सध्याच्या घडीला तर सरकार DoT चा रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत नवा कर लागू करायचा की नाही याचा निर्णय घेणार आहे. सरकारकडून याबाबत सध्या तरी कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून रेडिट पासून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सूत्रांच्या हवाल्यानं याबाबत बातम्या येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT