India Rafale Deal Pudhari
राष्ट्रीय

India Rafale Deal: सैन्याची ताकद वाढणार; भारत 114 राफेल खरेदी करणार, 3.25 लाख कोटींच्या डीलला मंजुरी

India Rafale Deal Approved: भारत सरकारने 114 डसॉल्ट राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 3.25 लाख कोटींच्या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. ही मंजुरी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाली.

Rahul Shelke

India Rafale Deal Final: भारत सरकारने संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत 114 डसॉल्ट राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, या व्यवहाराची अंदाजे किंमत 3.25 लाख कोटी आहे.

ही परिषद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या मंजुरीमुळे भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लढाऊ विमान खरेदी व्यवहारांपैकी एकाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हा निर्णय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याच्या अगदी आधी घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत–फ्रान्स संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

माहितीनुसार, या प्रकल्पासाठी “Acceptance of Necessity” (AoN) देण्यात आली असून, पुढील टप्प्यात फ्रान्सची विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशन सोबत औपचारिक चर्चा सुरू होणार आहे.

हवाई दलासाठी ही खरेदी का महत्त्वाची?

सध्या भारतीय वायुसेनेकडे फक्त सुमारे 29 फायटर स्क्वॉड्रन कार्यरत आहेत, तर मंजूर झालेल्या फायटरची संख्या 42 आहे. म्हणजेच हवाई दलाला मोठ्या प्रमाणात विमानांची कमतरता भासत आहे. पश्चिम आणि उत्तर सीमेवरील वाढत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही खरेदी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

भारत–फ्रान्स संरक्षण भागीदारी

या निर्णयामुळे केवळ विमानेच नाही, तर भविष्यात इंजिन, अवियोनिक्स, शस्त्र आणि संयुक्त संशोधन प्रकल्पांमध्येही सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. फ्रान्स भारताचा दीर्घकालीन आणि विश्वासार्ह संरक्षण भागीदार म्हणून महत्त्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर, ही राफेल खरेदी भारताच्या वायुसेनेसाठी महत्त्वाची असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT