INDIA Bloc Rally
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीच्या महामेळावा झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांसह काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि इतर नेतही सोबत आहेत.
आपण लढणारे लोक आहोत, भीतीने कोपऱ्यात दडून बसणारे नाही. याला विरोध करण्यासाठीच आपण सर्वजण आज येथे रामलीला मैदानावर जमलो आहोत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवलेच पाहिजे;आम्ही हे प्रकरण सहज सोडून देणार नाही. सध्याचे केंद्र सरकार, तसेच बिहार आणि उत्तर प्रदेशमधील सरकारे ही सर्व 'चोरलेली' (अवैध) सत्ता आहेत. या 'चोरांना' सत्तेतून हटवलेच पाहिजे, असा निर्धार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केला.
देशात मतांची चोरी करण्याची सुरुवात बिहारमधून झाली. सध्याच्या बिहारमधील सरकार बेकायदेशीर 'मागच्या दाराने' सत्तेत आलेले शासन आहे, असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला.
'इंडिया' (INDIA) आघाडीच्या रॅलीत बोलताना एआयएसए (AISA) अध्यक्षा नेहा बोरा म्हणाल्या, समानतेच्या मूलभूत अधिकाराला पायदळी तुडवले जात आहेत. मत अधिकारावरच भारताची लोकशाही उभी आहे. त्यांचा असा दावा आहे की, भारताला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यांना कदाचित असे वाटते की भाजपच्या समाप्तीसोबतच भारताचा इतिहासही संपेल. आज रामलीला मैदानावर उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण या सत्याचे साक्षीदार आहात: भारताच्या गौरवशाली इतिहासात भाजप किंवा आरएसएससाठी कधीही कोणतेही स्थान नव्हते."
पंजाब आणि हरियाणातून 'इंडिया' आघाडीच्या रॅलीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन येणारी वाहने पोहोचल्यामुळे सोनीपत-दिल्ली कुंडली सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. केजीपी-केएमपी झिरो पॉइंटजवळ कार, बस आणि ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस वाहनांची तपासणी करत होते आणि वाहतूक इतर मार्गांकडे वळवत होते.
अशीच परिस्थिती दिल्ली-गुरुग्राम सरहौल सीमेवरही दिसून आली, जिथे रॅलीसाठी जाणारी वाहने प्रचंड वाहतूक कोंडीत अडकली होती. त्रस्त झालेले काँग्रेस कार्यकर्ते पायीच दिल्लीच्या दिशेने निघाले; काहींनी पोलिसांचे बॅरिकेड्सही तोडल्याचे वृत्त आहे. गुरुग्राममधील काँग्रेस नेते पंकज डावर आणि वर्धन यादव यांनी सांगितले की, रॅलीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कार्यकर्ते आपला प्रवास पायीच सुरू ठेवतील.
दुसरीकडे, दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो समर्थक जमा झाले आहेत. हातात तिरंगा घेऊन आणि घोषणा देत हे समर्थक 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. या भव्य रॅलीसाठी मैदानावर लोकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.