राष्ट्रीय

कोळसा, खतांच्या मालवाहतुकीत वाढ

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातंर्गत मालवाहतुकीत भारतीय रेल्वे सातत्याने विक्रम प्रस्थापित करीत आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी १२४.०३ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ही वाढ ३.५५ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे महिन्याभरात ३.१८ मेट्रिक टन कोळशासह ०.९४ मेट्रिक टन खतांची मालवाहतूक करण्यात आली. कोळशाच्या मालवाहतुकीत ५.७० तर खतांच्या मालवाहतुकीत २५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

२०२१-२२ मध्ये १२७८.८४ मेट्रिक टन वाहतुकीच्या तुलनेत एप्रिल २२ ते फेब्रुवारी २३ पर्यंतची एकत्रित मालवाहतूक १३६७.४९ मेट्रिक टन इतकी झाली आहे. यंदाच्या मालवाहतुकीत ८८.६५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ ६.९३% इतकी होती, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ऊर्जा आणि कोळसा मंत्रालयांच्या समन्वयातून, ऊर्जा केंद्रांना कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी रेल्वे सातत्याने प्रयत्न आहे. पॉवर हाऊसेसमध्ये कोळशाची वाहतूक जानेवारीमध्ये ३.३९ मेट्रिक टननी वाढली आहे. ४५.६३ मेट्रिक टन कोळसा पॉवर हाऊसमध्ये हलविण्यात आला, जो गेल्या वर्षी ४२.२४ मेट्रिक टन होता, म्हणजेच यात ८.०२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्यांत, भारतीय रेल्वेने १५.४४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७९.६९ एमटी पेक्षा जास्त कोळसा पॉवर हाऊसपर्यंत पोहोचवला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT