Hindu Temple Vandalised In Australia: ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिराची पुन्हा एकदा खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड | पुढारी

Hindu Temple Vandalised In Australia: ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिराची पुन्हा एकदा खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड

पुढारी ऑनलाइन डेस्क : Hindu Temple Vandalised In Australia: ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी पुन्हा एकदा हिंदू मंदिरांना निशाणा बनवले आहे. खलिस्तानवाद्यांकडून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. शनिवारी ब्रिस्बेन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिरात ही तोडफोड करण्यात आली आहे. मंदिरचे अध्यक्ष सतिंदर शुक्ला यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की सकाळी जेव्हा श्रद्धाळू मंदिरात पूजा-पाठ करायला पोहोचले यावेळी त्यांनी मंदिराच्या भींतींना हानी पोहोचवल्याचे पाहिले.

Hindu Temple Vandalised In Australia: हिंदू ह्युमन राइट्सची निर्देशक सारा गेट्स यांनी म्हटले आहे की सिख फॉर जस्टिस यावर आधारित हे घृणास्पद कार्य करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात राहणा-या हिंदुंना घाबरवण्यासाठी केले आहे.

ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवरील हल्ले पहिल्यांदाच झालेले नाही. यापूर्वी देखील असे हल्ले झाले आहे. यापूर्वी जानेवारीत ऑस्ट्रेलियाच्या कॅरम डाऊन भागात स्थित श्री शिवा विष्णु मंदिरावर देखील भारत विरोधी नारे लिहिण्यात आले होते. मंदिरात ज्यावेळी हे नारे देण्यात आले होते तेव्हा मंदिरात तामिळी हिंदुंद्वारे थाई पोंगल हा उत्सव साजरा केला जात होता. याशिवाय मिली पार्क भागातील स्वामीनारायण मंदिरातही भारत विरोधी नारे लिहिण्याची घटना समोर आली आहे. तर मेलबर्नमधील इस्कॉन मंदिरातही तोडफोड करण्यात आली होती.

Hindu Temple Vandalised In Australia: खलिस्थानवाद्यांकडून काढण्यात आली होती रॅली

खलिस्तान समर्थकांनी 15 जानेवारी रोजी मेलबर्न येथे एक कार रॅली काढून खलिस्तानवर लोकमत एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मेलबर्नमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 60 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या राहते. मात्र, या रॅलीत फक्त 100 च्या आसपासच लोक उपस्थित होते. याचाच राग काढण्यासाठी सध्या हिंदू मंदिरांवर हल्ले केले जात आहे, असे मानले जात आहे.

दरम्यान, भारताने अशा कारवायांविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारसमोर हा विषय माडंला होता. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली होती.

हे ही वाचा :

Brain-eating amoeba | नळाचे पाणी वापरताय! मेंदू खाणाऱ्या अमिबाने एकाचा बळी, जाणून घ्या लक्षणे

Australia : ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड

Haryana Accident : वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या ६ मित्रांवर काळाचा घाला, डंपरने कारला धडक देऊन १०० मीटर नेले फरफटत

Back to top button