IAF Wing Commander Espionage Case: भारतीय वायू सेनेचा एक विंग कमांडरने देशाशी गद्दारी केली आहे. पाकिस्तानच्या एका गुप्तहेराच्या जाळ्यात हा विंग कमांडर अशा प्रकारे अडकला की त्याने भारतीय वायूसेनेची काही संवेदनशील माहिती लीक केली. पोलिसांनी याबाबत दिल्लीच्या एका न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. त्यात हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विंग कमांडरने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला काही नग्न फोटोंच्या बदल्यात अत्यंत गोपनीय ऑपरेशनल माहिती शेअर केली. पाच महिन्यापूर्वी भारतीय वायू सेनेतील या विंग कमांडरला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितलं की विंग कमांडरने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला युद्ध योजनेचे दस्तऐवज, ड्रोन क्षमता, सैन्य तैनातीची ठिकाणी, फ्रंटलाईन लढाऊ विमानांची येजा आणि संवेदनशील ठिकाणांचे कोऑर्डिनेट्स शेअर केले होते.
पोलिसांनी कोर्टात सांगितलं की या प्रकारे माहिती लीक होण्यासोबतच देशाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. यातून ऑपरेशनल त्रुटी समोर येऊ शकतात आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. चार्जशीटनुसार विंग कमांडरने एक गुप्त ड्रोन युनिटची बलस्थाने आणि त्याचे स्ट्रक्चर याची देखील माहिति दिली होती. त्यात ड्रोन युनिटच्या ऑपरेशनल क्षमता, युद्धावेळीची तैनाती कोणत्या ठिकाणी असते. लढाऊ विमानांच्या ट्रॅफिकबाबत देखील माहिती दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विंग कमांडरने या वर्षी १२ जानेवारी पासून १ एप्रिल दरम्यान व्हॉट्स अॅपवर संदिग्ध एजंटशी संपर्कात होता. ज्यावेळी विंग कमांडरला आपल्या ऑफिसमध्ये स्मार्टफोन घेऊन गेले त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं होतं. त्यांची तपासणी करण्यात आली होती. पोलिसांच्या चार्जशीटनुसार अधिकाऱ्याने संदिग्ध पाकिस्तानी एजंटकडून नग्न फोटो मिळाल्यानंतर एक गुप्त युद्ध योजनेचे एख पान अपलोड केले होते. एवढेच नाही तर प्रत्येक नग्न फोटोसाठी युद्ध योजनेचे एक पान देण्याचे कबुल केले होते.
पोलिसांनी सांगितलं की पाकिस्तानी एजंटने काही मालवेअर एप्लिकेशन पाठवले होते. त्याद्वारे अधिकाऱ्यांच्या डिवाईसमधील संवेदनशील माहिती आणि त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेले संभाषण देखील ऐकू अन् पाहू शकत होता. चार्जशीटमध्ये विंग कमांडरने लेह मध्ये फाटर जेट्सच्या तैनाती आणि सूरतगढच्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये झालेल्या लष्करी सरावाबाबतची माहिती देखील लीक केली होती.
चार्जशीटमध्ये अधिकारी आणि त्या संशयीत एजंटदरम्यान कोणत्या स्तरावरचे संभाषण झाले होते याचे वर्णन आहे. व्हॉट्स एप पीएमपी डेटाच्या विश्लेषणात लक्षात येतं की अधिकारी आणि संशयित पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत एकूण ३००८ टेक्स्ट मॅसेज, ६५ फोटो, ६५ रिअॅक्शन, ४२ वॉईस कॉल, ४ व्हिडिओ कॉल आणि ६ युआरएल शेअर झाले होते.