

Lt Gen Rajesh Pushkar Goc In C
पुणे : लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी बुधवारी (दि. १) सदर्न कमांडचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची ले. जन. संदीप जैन यांच्या जागी नियुक्ती झाली. तर जैन यांची उपलष्कर प्रमुख पदी पदोन्नती झाली आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले ले. जन. पुष्कर डिसेंबर १९८८ मध्ये ७४ आर्मर्ड रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची चार दशकांहून अधिक काळ लष्करी कारकीर्द गौरवशाली आहे. त्यांनी विविध भौगोलिक कार्यक्षेत्रांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी निर्णायक नेतृत्व, धोरणात्मक दूरदृष्टी दाखवली. ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षकही होते.