Hyderabad Shocking News: pudhari
राष्ट्रीय

Hyderabad Shocking News: आई आहे की सैतान... १४ महिन्याच्या मुलीचा उशीने तोंड दाबून घेतला जीव; रमजानमध्ये पतीसोबत झाला वाद

Anirudha Sankpal

Hyderabad Shocking News: हैदराबादमधून एक अत्यंत हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका आईवर आपल्या निष्पाप मुलाची हत्या केल्याचा आरोप झाला आहे. ही घटना शहरातील रिसाला बाजारमधील असल्याचं सांगितलं जात आहे. गोलकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो.

मिळालेल्या माहितीनुसार घरात रमजानच्या निमित्ताने कपडे खरेदी करण्यावरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. हा छोट्या वादानं गंभीर स्वरूप धारण केलं. यानंतर जी घटना घडली त्यामुळं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे.

रागाच्या भरात उचललं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार गौसिया बेगम या महिलेचे तिच्या पतीसोबत भांडण झालं. या भांडणानंतर ती खूप रागात होती. त्याचवेळी तिनं जे पाऊल उचललं तिची कल्पनाच कोणी करू शकणार नाही. आरोपी महिलेनं रागाच्या भरात आपल्या १४ महिन्याच्या मुलीची तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली. मुलगी श्वास गुदमरल्यामुळं बेशुद्ध झाली होती. ही गोष्ट कुटुंबियांच्या लक्षात येईपर्यंत खूप वेळ झाला होता.

कुटुंबावर शोककळा

मिळालेल्या माहितीनुसार या १४ महिन्याच्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तिचा जीव काही वाचला नाही. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळं स्थानिक लोकं आणि शेजारी पाजारी देखील शॉकमध्ये आहेत. कोणालाही एक आई आपल्या मुलासोबत असं करू शकते याच्यावर विश्वास बसत नाहीये.

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच गोलकोंडा पोलिसांनी तापस सुरू केला आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून प्रथामिक तसाप सुरू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाणार आहे. पोलीस या वादाच्या मागचे खरे कारण काय होते याचा देखील तपास करत आहेत. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरात कोण कोण होतं यासह अनेक पैलूंनी या प्रकरणाची चौकशी केली जात आहे

कौटुंबिक वाद अन् हत्या

पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार रमजान महिन्यात कपडे खरेदीवरून पती पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर रागाच्या भरात महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर खरं कारण बाहेर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT