Shocking Murder Case | दुसऱ्या लग्नाचा राग...दोन महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरने गाठली क्रूरतेची सीमा

Shocking Murder Case | तीन महिन्‍यांची गर्भवती असणार्‍या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार, डोक्यात घातली कुंडी
Shocking Murder Case | दुसऱ्या लग्नाचा राग...दोन महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरने गाठली क्रूरतेची सीमा
Published on
Updated on

Shocking Murder Case |

हैदराबाद : दुसऱ्या लग्नाचा राग मनात धरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या ३० वर्षीय पूर्वाश्रमीच्या पत्नीची तीक्ष्ण हत्याराने वार करून आणि डोक्यात कुंडी घालून निर्घृण हत्या केली. ही धक्‍कादायक घटना येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली.

२०२२मध्‍ये विवाह २०२४ मध्‍ये घटस्‍फोट

सुनीता आणि महेश यांचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. २०२४ मध्ये त्यांनी सामंजस्याने घटस्फोट घेतला होता.

Shocking Murder Case | दुसऱ्या लग्नाचा राग...दोन महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरने गाठली क्रूरतेची सीमा
Shocking Crime News: लाँग ड्राईव्ह वेळी झाला वाद... CA ने पत्नीचा थेट कात्रीनंच गळा चिरला... पोलिसांनी १८ तासात कसा छडा लावला?

दुसरे लग्‍न केल्‍याचा राग

घटस्फोटानंतर एप्रिल २०२५ मध्ये सुनीताने दुसरे लग्न केले होते. याच गोष्टीचा राग महेशच्या मनात होता. सुनीताने महेशविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामुळे महेशचा पासपोर्ट रद्द झाला होता. त्याला परदेशात जाण्यास अडथळे येत होते. यामुळे तो बेरोजगार झाला होता आणि नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

Shocking Murder Case | दुसऱ्या लग्नाचा राग...दोन महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरने गाठली क्रूरतेची सीमा
Crime News: एमबीए विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडिओ आणि निर्वस्त्र मृतदेह, प्रियकरानेच गळा आवळून केली हत्या! कारण धक्कादायकच

तीक्ष्ण हत्याराने वार, डोक्‍यात कुंडी फोडली

या धक्‍कादायक प्रकरणी स्‍थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सुनीता (३०) आयटी इंजिनिअर होती. तिचा माजी पती महेश हाही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्‍याने सुनीतावर चाकू आणि विळ्याने सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता त्याने तिच्या डोक्यात फुलांची कुंडी घातली. या भीषण हल्‍ल्‍यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Shocking Murder Case | दुसऱ्या लग्नाचा राग...दोन महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरने गाठली क्रूरतेची सीमा
Crime News: इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, प्रियकरासाठी महाराष्ट्रातील घर सोडलं; ३ महिन्यांतच पेटीत सापडला सियाचा मृतदेह

दोन महिन्यांच्या रचत होता कट

महेशने नियोजित पद्धतीने हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीताचा पत्ता शोधला आणि गेल्या दोन महिन्यांपासून तो हैदराबादमधील एका हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. बुधवारी (दि. १७) तो सुनीता राहत असणार्‍या प्‍लॅटमध्ये शिरला. हत्येनंतर पोलिसांनी त्याला परिसरातूनच ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत दोन चाकू, एक ड्रिलिंग मशीन आणि ५ लिटर पेट्रोलचा कॅन आढळून आला आहे, ज्यावरून तो मोठा अनर्थ घडवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Shocking Murder Case | दुसऱ्या लग्नाचा राग...दोन महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरने गाठली क्रूरतेची सीमा
Jalgaon crime news | 'रामू, माझी स्टोरी इन्स्टावर टाक...' प्राचार्याच्या जाचाला कंटाळून १९ वर्षीय तरुणाने जीवन संपवले

सुनीता तीन महिन्‍यांची गर्भवती

सुनीताच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती तीन महिन्यांची गरोदर होती. मात्र, पोलिसांनी अद्याप या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत स्पष्टता येईल, असे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news