Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: ‘भूतबाधा’ झाल्याचे सांगून पुजाऱ्याचा महिलेवर लैंगिक अत्याचार

‘भूतबाधा झाली असून, त्यावर उपचार करण्यासाठी विशेष धार्मिक विधी करावा लागेल’, असा बनाव रचत एका पुजाऱ्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

पुढारी वृत्तसेवा

Canada crime news

नवी दिल्ली: ‘भूतबाधा झाली असून, त्यावर उपचार करण्यासाठी विशेष धार्मिक विधी करावा लागेल’, असा बनाव रचत एका पुजाऱ्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. कॅनडामध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी एका ५० वर्षीय पुजाऱ्याला अटक केली आहे. राजेंद्रनाथ डूडनाथ महाराज, असे त्याचे नाव असून तो न्यूयॉर्कचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी राजेंद्रनाथ डूडनाथ महाराज याला ओंटारियो प्रांतातील ओशावा येथील एका कुटुंबाने धार्मिक विधी करण्यासाठी बोलावले होते. त्याने पीडित महिलेला ती दुष्ट आत्म्यांच्या प्रभावाखाली असल्याचे भासवले. भूतबाधेतून मुक्त होण्यासाठी विशिष्ट धार्मिक विधी करण्याची गरज असल्याचे सांगून त्याने तिची दिशाभूल केली. त्यानंतर पुजारी महिलेला एका खासगी ठिकाणी घेऊन गेला. तेथे धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी पीडित महिला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराची किंवा संबंधित घटनेची माहिती असलेल्या व्यक्तींनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

२१ वर्षांच्या मॉडेलसोबत तिच्याच घरात नेमकं काय घडलं?

एका दिल्लीतील टिळक नगर भागात बुधवारी संध्याकाळी एका २१ वर्षीय तरुणीची तिच्याच घरात चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुस्कान असे मृत तरुणीचे नाव असून ती शिक्षण घेत मॉडेलिंग करत होती. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय आहे.

घटनेच्या वेळी मुस्कान घरात एकटीच होती. याचाच गैरफायदा घेत हल्लेखाराने तिच्या पोटात आणि शरीराच्या इतर भागांवर चाकूने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT