Heart breaking Story pudhari photo
राष्ट्रीय

Heart breaking Story: पत्नीचं अजूनही EX वर प्रेम, तूही त्याच्यासारखाच म्हणून... भारतीय तरूणाची ह्रदय पिळवटून टाकणारी कहानी

३३ वर्षाच्या एका भारतीय व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनाबाबत एक दुःखद कहानी सोशल मीडियावर शेअर केली.

Anirudha Sankpal

Heart breaking Story: भारतीय परंपरेनुसार लग्न हे एक अतूट बंधन मानलं गेलं आहे. लग्नानंतर पती पत्नींनी आपला भूतकाळ विसरून एकत्र संसार करतात अशी एक धारणा आहे. मात्र आता एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे प्रत्येक जोडल्याला याबाबत पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

३३ वर्षाच्या एका भारतीय व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनाबाबत एक दुःखद कहानी सोशल मीडियावर शेअर केली. ही गोष्ट ऐकून कोणाचंही ह्रदय पिळवटून जाईल. हा ३३ वर्षाचा भारतीय म्हणतो की त्याच्या लग्नाला ५ वर्षे झाली तरी त्याची पत्नी अजूनही तिच्या एक्स सोबत भावनिकदृष्ट्या जोडले गेलेली आहे.

लग्नापूर्वी सर्व ठीक होतं

या भारतीय व्यक्तीनं सांगितलं की लग्नापूर्वी सर्व काही ठीक होतं. मी आणि माझी पत्नी जवळपास ६ महिने रिलेशनशीपमध्ये होतो. मला माझ्या पत्नीच्या जुन्या नात्यााबबत माहिती होती. मात्र मला विश्वास होता की पत्नीचे आणि तिच्या एक्सचे नाते आता संपुष्टात आलं आहे. पत्नीने देखील त्याला सांगितले होते की ती आता त्याच्या एक्सच्या संपर्कात नाही. म्हणूनच या भारतीय मुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटलं की आता त्याच्या आयुष्यात प्रेम, सन्मान आणि जवळीक सर्वकाही मिळेल.

पत्नीचं वागणं अचानक बदललं

सर्व काही ठीक सुरू असतानाच एक दिवस पत्नीची भेट तिच्या एक्स सोबत झाली. त्यानंतर तिचे वागणे पूर्णपणे बदलले. ती अचानक गप्प गप्प राहू लागली. उदास राहू लागली. ती त्याच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर चालली होती. पतीने पत्नीला तिच्या वागण्याबद्दल सतत विचारण्याचा प्रयत्न केला.

मी त्याला विसरू शकत नाहीये...

मात्र खूप दिवसांनी तिने शेवटी पतीला सांगितलं की ती तिच्या एक्सला विसरू शकत नाहीये. आजही मला जर ते नातं अजून राहिलं असतं तर तिचे आयुष्य कसे असते. यानंतर पत्नीने एक धक्कादायक गोष्ट पतीला सांगितली. ती म्हणाली की तू मला माझ्या एक्स सारखाच वाटलास म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं.

३३ वर्षाच्या भारतीय व्यक्तीने ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याला मी फक्त एका व्यक्तीची रिप्लेसमेंट आहे. तिची पत्नी सोशल मीडियावर असे व्हिडिओ सेव्ह करत होती ज्यात जुन्या प्रेमाबद्दल बोललं जात होतं. ज्यावेळी मी पत्नीपासून दूर असतो त्यावेळी मला खूप राग येते. मात्र मी त्याच्यासमोर आलो की सर्वकाही विसरून जातो. मी स्वतःला मागे ठेवून तिच्या आनंदाचा विचार करतो.

आत्मसन्मान की प्रेम?

३३ वर्षाच्या या भारतीय व्यक्तीची कहानी ही फक्त एका लग्नाची गोष्ट नाहीये. असे अनेक लोकं आहेत जे एका नात्यात असूनही ते स्वतःला एकटं समजतात. प्रेमाचा अर्थ तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी सावली होणे हा नाही. कोणाचातरी पर्याय म्हणून राहणे योग्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT