

नागपूर : नागपुरातील प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवार भुषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने वातावरण तापले आहे. भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसवर गुंडांना हाताशी घेत सर्वसामान्य उमेदवारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.
या पद्धतीने लोकशाहीत या प्रकारांना जनता भीक घालणार नाही महायुतीलाच कौल मिळेल असा दावा केला. काँग्रेस कार्यकर्ते चाचेरकर यांच्यावर यासंदर्भात भाजपने आरोप केले. भूषण शिंगणे यांच्यासोबत मध्यरात्रीच्या वेळी गोरेवाडा परिसरात पैसे वाटले जात असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी भूषण शिंदे हे तिकडे गेले होते. विठ्ठल यांच्या घरी जाऊन माहिती घेण्याच्या प्रयत्नात असताना काही तरुण पुढे आले. दरम्यान एका जमावाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
दोन तीन कार्यकर्तेही जखमी झाले. सुदैवाने कार्यकर्त्यांनी वेळेवर धाव घेत त्यांची सुटका केली जखमी अवस्थेत त्यांना इंदिरा गांधी मेडिकल हॉस्पिटल येथे आणले त्यांच्या नाक,छाती, पायाला मार बसला असून त्यांचा जीव थोडक्यात बचावल्याचे तिवारी यांनी सांगितले.