

Male Infertility Test Before Marriage: लग्नापूर्वी अनेकदा होणारे पती - पत्नी हे आपल्या शारीरिक समस्यांबाबत चर्चा करतात. मात्र आता ट्रेंड बदलत असून लग्नापूर्वी जोडपे लग्नापूर्वी चर्चा न करता थेट हेल्थ चेकअप करून घेत आहेत. यातील काही जोडपी तर गुप्तपणे फर्टिलिटी टेस्ट देखील करून घेत आहेत. फॅमिली प्लॅनिंगच्या बाबतीत पुरूष देखील गांभिऱ्याने विचार करत असून ते आपली फर्टिलिटी टेस्ट करून घेत आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लग्नानंतर नको असलेल्या डोकेदुखीपासून वाचण्यासाठी फर्टिलिटी टेस्ट करून घेण्यासाठी ओपीडीमध्ये येणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली आहे. त्यांना भविष्यात याबाबत अडचण निर्माण होऊ नये म्हणून ही चाचणी करून घेतली जात आहे. विशेष म्हणजे तिथं प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही तिथंच सर्वात जास्त प्रॉब्लेम असल्याचं देखील आढळून आलं आहे.
फर्टिलीटी तज्ज्ञ डॉक्टर अंजली मालपानी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जगभरात शुक्राणूंची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. २०२२ मधील एका विश्लेषणानुसार २०२२ च्या मेटा अॅनेलिसिसमध्ये १९७३ ते २०१८ दरम्यान पुरूषांचा सरासरी स्पर्म काऊंट कॉन्स्ट्रेशनमध्ये ५१.६ टक्क्यांची घसरण झाली आहे.
डॉक्टर अंजली यांच्या मते, 'WHO प्रती मिलीलीटर १५ मिलियन स्पर्मकाऊंट ही कमी पातळी मानते. १९९० मध्ये ज्यावेळी मी पहिली स्पर्म बँक सुरू केली होती. त्यावेळी डोनरसाठी यापेक्षा कितीतीर जास्त काऊंट गरजेचा होता. आता ही स्थिती शक्यच नाहीये.'
गुरूग्रामधील मेदांता हॉस्टिपटलचे युरोलॉजी आणि रीनल केअर डिपार्टमेंटचे प्राध्यापक एमेरिट्स डॉक्टर नर्मदा प्रसाद गुप्ता यांचं म्हणणं आहे की, 'सध्याच्या काही महिन्यात त्यांच्या ओपीडीमध्ये तरूणांची संख्या वेगानं वाढली आहे. हे तरूण आपली फर्टिलिटी टेस्ट करण्यासाठी ओपीडीमध्ये येत आहेत.
डॉक्टर गुप्ता एका केसबाबत सांगताना म्हणाल्या, एक जोडपं ज्यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली होती ते माझ्याकडे येत होतं. ते कुटुंबाच्या दबावाखाली फर्टिलिटी टेस्ट करण्यासाठी येत होते. मुलींच्या सर्व टेस्ट नॉर्मल येत होत्या. मात्र ज्यावेळी मुलाची टेस्ट करण्यात आली त्यावेळी जन्मजात समस्येमुळं त्याचा स्पर्म काऊंट हा कमी आला.
दुसऱ्या एका प्रकरणात एक मुलगी लग्नापूर्वीच तिच्या होण्याऱ्या पतीकडे फर्टिलिटी चाचणी करण्याची मागणी करत होती. आता मुली अन् मुलं दोघेही भविष्यातील फर्टिलिटीच्या समस्येपासून वाचण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होऊ इच्छितात.
मात्र असं असलं तरी वंध्यत्व हे महिलांशीच जोडून पाहिलं जातं. मात्र काही आकडेवारीनुसार देशातील एकूण वंध्यत्वाच्या केसेसमधील ४० टक्के केसेस या पुरूष कारण असतो. ४० टक्के महिला आणि १० टक्के दोन्ही पार्टनर्समुळे तर १० टक्के केसेसमध्ये कोणतंच कारण समजून येत नाही.
डॉक्टरांच्या मते, जर १ वर्ष नियमित आणि असुरक्षित शरीरसंबंध ठेवूनही जोडीदार गरोदर राहत नसेल, तर त्याला वंध्यत्व मानले जाऊ शकते. यात केवळ शुक्राणूंची संख्या (Sperm Count) महत्त्वाची नसते, तर त्यांचे आरोग्यही महत्त्वाचे असते.
केवळ संख्या असून चालत नाही, तर शुक्राणूंची हालचाल (Motility) आणि त्यांचा आकार (Morphology) योग्य असणे गरजेचे आहे. जर शुक्राणूंची हालचाल मंद असेल किंवा त्यांचा आकार सामान्य नसेल, तर गर्भधारणेत अडथळे येतात.
एम्सच्या (AIIMS) अभ्यासानुसार पुरुषांमध्ये दोन प्रमुख समस्या आढळतात.
एझूस्पर्मिया (Azoospermia): यामध्ये वीर्याच्या नमुन्यात शुक्राणू अजिबात नसतात.
OATS सिंड्रोम: यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, त्यांची हालचाल मंद असणे किंवा त्यांचा आकार असामान्य असणे या तिन्ही समस्या एकत्रितपणे आढळतात.
स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचे वय वाढल्यानंतर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ लागते. धुम्रपान, मद्यपान, चुकीचा आहार, सततचा ताण आणि कामाचे अतिरिक्त तास यामुळे शुक्राणूंच्या DNA ला इजा पोहोचते. हवेतील प्रदूषण (PM 2.5), जड धातू (Heavy Metals) आणि शेतीतील कीटनाशके शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.
नॅनोप्लास्टिक्स आणि 'BPA' सारखे घटक शुक्राणूंमधील प्रथिनांना खराब करतात आणि अंडकोषांना (Testis) हानी पोहोचवतात.