Harley CVO Street Glide
नवी दिल्ली: अमेरिकेतील हार्ले-डेव्हिडसन कंपनीने आपल्या 2025 लाइनअपमधील दोन अत्यंत प्रीमियम मॉडेल्स भारतीय बाजारात लाँच केले आहेत. CVO स्ट्रीट ग्लाइड आणि CVO रोड ग्लाइड या दोन नवीन दमदार बाईक्स लॉन्च केल्या आहेत. कंपनीच्या या भारतातील सर्वात महागड्या बाईक असून लांब पल्ल्याच्या पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या रायडर्ससाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.
लांबचा प्रवास अधिक आनंददायक आणि सुरक्षित बनवण्यासाठी CVO स्ट्रीट ग्लाइडमध्ये अनेक फीचर्स दिली आहेत.
१२.३-इंच टीएफटी टचस्क्रीन डिस्प्ले
फेअरिंग आणि सॅडलबॅग्समध्ये स्पीकर्ससह इन-बिल्ट म्युझिक सिस्टीम.
ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम), ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-होल्ड कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल.
एक प्रगत IMU (Inertial Measurement Unit), जो वळताना या सिस्टीमना अधिक अचूकपणे कार्य करण्यास मदत करतो.
ही वैशिष्ट्ये मोटरसायकलला प्रीमियम, आधुनिक आणि अत्यंत रायडर-फ्रेंडली बनवतात.
किंमत किती?
CVO स्ट्रीट ग्लाइड : ६३.०३ लाख (एक्स-शोरूम)
CVO रोड ग्लाइड : ६७.३७ लाख (एक्स-शोरूम)
CVO स्ट्रीट ग्लाइड मध्ये १,९८२ सीसी V-ट्विन इंजिन आहे, जे हार्ले-डेव्हिडसनने भारतात दिलेल्या सर्वात मोठ्या इंजिनांपैकी एक आहे. इंजिन ११३.४ bhp पॉवर आणि प्रचंड १८९ Nm चा टॉर्क निर्माण करते. यामुळे रायडर्सना, विशेषतः महामार्गावर क्रूझिंग करताना, मजबूत पुलिंग पॉवर मिळते. हे इंजिन स्टँडर्ड स्ट्रीट ग्लाइडमध्ये वापरलेल्या इंजिनपेक्षाही मोठे आहे, ज्यामुळे CVO व्हर्जन अधिक शक्तिशाली ठरते. याला ६-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लच जोडलेला आहे, ज्यामुळे सहज गिअर बदलता येतात.
ब्रेम्बो ४-पिस्टन फ्रंट ब्रेक्स,अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन, अॅल्युमिनियम चाके, २२.७ लिटरची मोठी इंधन टाकी, ६८० मिमी कमी सीटची उंची आणि १४० मिमी ग्राउंड क्लिअरन्स.
CVO स्ट्रीट ग्लाइड दोन स्टायलिंग थीम्ससह तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - क्रोम फिनिश आणि ब्लॅक्ड-आउट फिनिश.