पुढारी वृत्तसेवा
Hero MotoCorp आणि जगप्रसिद्ध Harley-Davidson यांनी भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित Harley-Davidson H-D X440 T मॉडेल लाँच केले.
ही बाईक लोकप्रिय X440 मॉडेलचेच अधिक फीचर्स आणि तंत्रज्ञान असलेले सुधारित मॉडेल आहे.
यामध्ये मागील सब-फ्रेम पूर्णपणे बदलली आहे. स्टँडर्ड X440 मधील सरळ फेंडर काढून त्याऐवजी अधिक स्लीक आणि आकर्षक शेप असलेला मागील भाग दिला आहे.
'राईड-बाय-वायर' तंत्रज्ञानामुळे पुढील कॉकपिटमधील केबल्स कमी झाल्या आहेत, ज्यामुळे ते अधिक स्वच्छ आणि आधुनिक दिसते.
बाईकला अधिक दमदार लूक देण्यासाठी आणि रायडिंग एर्गोनॉमिक्स सुधारण्यासाठी हँडलबार जास्त सपाट आणि रुंद करण्यात आला आहे.
बाईक Vivid Black, Pearl Red, Pearl White आणि Pearl Blue या चार नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
राईड मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, पॅनिक ब्रेकिंग अलर्ट, डिस्प्ले यामध्ये प्रथमच अनेक प्रगत इलेक्ट्रॉनिक्स फीचर्स जोडण्यात आली आहेत.
इंजिनमध्ये बदल केलेला नाही. इंजिन X440 प्रमाणेच ठेवण्यात आले आहे.
X440 T मॉडेल रु. २,७९,५०० ला लाँच करण्यात आले असून, यासोबतच X440 S आणि X440 Vivid या मॉडेल्सच्या किमतीही कमी करण्यात आल्या आहेत.