Court Order Pudhari
राष्ट्रीय

Law News: बाली ते इजिप्तपर्यंत फिरले.. आता बलात्काराचा दावा तर्कसंगत वाटत नाही; हायकोर्टाकडून प्रियकराला दिलासा

punjab haryana high court judgment: दोघेही एकत्र बाली ते इजिप्तपर्यंत फिरले आणि त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

punjab haryana high court judgment

चंदीगड : गुरुग्राममध्ये नोंदवण्यात आलेला अत्याचाराचा एक गुन्हा रद्द करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने म्हटले की, उपलब्ध रेकॉर्डवरील तथ्यांवरून हे प्रकरण जबरदस्तीने ठेवलेल्या संबंधांचे नसून, परस्पर संमती आणि मैत्रीचे असल्याचे दिसून येते. दोघेही एकत्र बाली ते इजिप्तपर्यंत फिरले आणि त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतरच्या काळात या नात्याला गुन्हेगारी स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, असे न्यायालयाने मानले.

न्यायमूर्ती एन.एस. शेखावत यांच्या खंडपीठाने मे २०२४ मध्ये या संदर्भात नोंदवण्यात आलेली एफआयआर, अंतिम अहवाल आणि त्यासंबंधित सर्व गुन्हेगारी कार्यवाही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने नमूद केले की, तक्रारदार महिला त्यावेळी आधीच विवाहित होती आणि पतीसोबतच्या वादामुळे तिची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती, जी ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण झाली. अशा परिस्थितीत, संशयीत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्याचा आरोप न्यायालयाला तर्कसंगत वाटला नाही. बलात्काराचे आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर घटक या प्रकरणात अस्तित्वात नाहीत, त्यामुळे एफआयआर रद्द करणे योग्य आहे, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

कोठडीतील मृत्यू प्रकरणी सरकारकडे उत्तर मागितले

चंदीगड चंदीगडमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुरुग्रामच्या फरुखनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथित पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात हरियाणा सरकारला नोटीस बजावली आहे. राजस्थानमधील खैरथल येथील रहिवासी असलेल्या अलीजान याने याचिका दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी आसिफला ताब्यात घेऊन 'थर्ड डिग्री'चा वापर केला आणि नंतर त्याने जीवन संपविल्याची माहिती दिली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT