Crime News Pudhari
राष्ट्रीय

shocking crime news|भयंकर! नराधम बापाने केली पत्नीसह ४ मुलांची निर्घृण हत्‍या; गळा चिरुन स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्‍न

Gurgaon Wazirpur Murder Case| आरोपीने संपूर्ण कुटुंबाला विष दिल्‍याचेही प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

Gurgaon Man Kills Wife and 4 Children

गुरुग्राम : वझीरपूर गावात शनिवारी रात्री उशिरा एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि चार मुलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबाचा बळी घेतल्यावर या आरोपीने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्‍थांनी दिली पोलिसांना माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नियंत्रण कक्षाला (PCR) एक फोन आला. वझीरपूर गावातील एका घरात एका व्यक्तीसह त्याची पत्नी आणि चार मुलांचे मृतदेह पडले असल्याची माहिती देण्यात आली होती. ही घटना रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आधी संपूर्ण कुटुंबाला दिलं विष

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती ३० वर्षांची असून तो एका सलूनमध्ये काम करतो. सध्या त्याच्यावर स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने आधी संपूर्ण कुटुंबाला विष दिले आणि त्यानंतर स्वतःच्या हाताची नस आणि गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीची प्रकृती चिंताजनक

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवगृहात पाठवण्यात आले असून, मृतांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

अद्याप चौकशी प्रलंबित

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याने तो जबाब देण्याच्या स्थितीत नाही. डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर असल्याचे घोषित केल्यानंतरच त्याची चौकशी केली जाईल. या भीषण हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक टंचाई यातून हे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांना आहे. आरोपीचा जबाब आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा अधिक उलगडा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT