राष्ट्रीय

गुजरात निवडणूक : अखेर राहुल, सोनिया गांधी २५ रॅलीत सहभागी होणार

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आपली संपूर्ण ताकद गुजरातवर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ दिवसांत १२५ विधानसभा मतदारसंघांत एकूण २५ मोठ्या रॅली काढण्यात येणार आहेत. या रॅलीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे बडे नेते सहभागी होणार असून आक्रमकपणे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

याबाबत काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी हे देखील गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रात आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले नव्हते. परंतु ते गुजरातच्या विधानसभा निवडणूक प्रचारात सक्रिय होणार आहेत.

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते, अल्पसंख्याक नेते येत्या काही दिवसांत गुजरातमध्ये रॅली आणि निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. यावेळी काँग्रेसने आक्रमक निवडणूक प्रचाराची रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी राज्यात आक्रमक निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. त्यामुळे भाजपला ९९ जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, काँग्रेसने सत्ताधारी भाजपसमोर कडवे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT