iPhone 18 Pro Theft pudhari
राष्ट्रीय

iPhone 18 Pro Theft: आधी महिलेला विचारलं हा 18 Pro च आहे का... मग हिसकावून पळ काढला; नवा कोरा iPhone तिसऱ्या दिवशी गायब

Anirudha Sankpal

iPhone 18 Pro Theft: ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेचा नवा कोरा आयफोन १८ प्रो घेतलेल्या दुसऱ्याच दिवशी चोरीला गेला. विशेष म्हणजे चोरी करणाऱ्या मुलांनी आधी त्या महिलेला विचारून घेतलं की हा नवा लाँच झालेला आयफोन १८ प्रोच आहे का त्यानंतर त्यांनी तो हिसकावून घेतला.

शुभी भंडारी ही महिला तिच्या कामाच्या ठिकाणी जात होती. तिने ई-रिक्षा केली होती त्याचवेळी गाडीवरून आलेल्या दोन पुरूषांनी तिचा नवा कोरा १८ प्रो हिसकावून घेत चोरला.

आधी पत्ता मग आयफोनबाबत चौकशी

शुभी यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शुभी यांनी ई - रिक्षाचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपला नवा कोरा आयफोन १८ प्रो बाहेर काढला. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेले दोन पुरूष तिच्याजवळ आले. त्या दोघांनीही हेलमेट घातले होते. त्यातील एकाने आधी पत्ता विचारला. त्यानंतर त्यांनी हा आयफोन आहे का असं विचारलं.

पतीचा पोलिसांवरही रोष

ज्यावेळी शुभा यांनी त्याचे उत्तर दिले त्यावेळी त्यातील एका पुरूषाने तो फोन हिसकावून घेतला अन् तेथून पळ काढला. शुभा यांचे पती साकेत गुप्ता यांनी सांगितलं की तीन दिवसापूर्वीच आयफोन १८ प्रो खरेदी करण्यात आला होता. आता कुटुंबीयांनी आयफोन चोरीची तक्रार दाखल केली आहे. गुप्ता यांनी सकाळच्या वेळी मुख्य रस्त्यांवर पोलिसांची तैनाती कमी का असते असा प्रश्न देखील उपस्थित केला.

दरम्यान, याबाबत पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी ऑनलाईन एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पीडित महिलेच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान एसएचओ रणजीत सिंग यांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. तसेच या प्रकरणी पुरावे देखील गोळा केले जात आहेत.

जवळपास दीड लाख किंमत

भारतात आयफोन १८ प्रोची किंमत १ लाख ६४ हजार ९०० रूपयांपासून सुरू होते. त्यात २५६ जीबी, ५१२ जीबी, १ टीबी आणि २ टीबी असे स्टोअरेज ऑप्शन मिळतात. आयफोन १८ प्रो हा काळा, चंदेरी, ग्लेशियर आणि न्यू बर्गंडी फिनिश रंगात उपलब्ध आहे.

या फोनमध्ये ४८ मेगपिक्सल फ्युजन मेन कॅमेरा असून त्यात प्रो कॅमेरा कन्ट्रोल आहेत. या फोनमध्ये अॅप्पलची A20 प्रो चीप असून व्हेपर चेंबर देखील आहे. त्याचबरोबर यात AI फिचर देखील देण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT