नवी दिल्ली : गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात 15 अब्ज डॉलर्सच्या मोठ्या पायाभूत गुंतवणुकीची घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये त्यांनी ही माहिती दिली. ही गुंतवणूक देशातील एआय कॉम्प्युटिंग क्षमता, डेटा सेंटर्स आणि कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी केली जाणार आहे. याचसोबत अमेरिका-भारत कनेक्टिव्हिटीअंतर्गत चार नवीन सागरी फायबर ऑप्टिक केबल प्रकल्पही सुरू केले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पिचाई म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या काळातील सर्वात मोठा तांत्रिक बदल आहे. एआयमुळे काही कामांचे ऑटोमेशन होईल, अनेक भूमिका बदलतील. परंतु मोठ्या प्रमाणात नवीन नोकऱ्याही निर्माण होतील. 20 वर्षांपूर्वी यूट्यूब क्रिएटरसारखी कोणतीही नोकरी अस्तित्वात नव्हती. परंतु आज तो करिअरचा एक मोठा पर्याय बनला आहे.
पिचाई यांनी स्पष्ट केले की, इंटरनेटच्या प्रारंभीच्या काळात श्रीमंत-गरीब आणि शहर-गाव अशी दरी होती, तशी स्थिती एआयच्या बाबतीत होणार नाही. एआयची सुविधा केवळ काही देशांपर्यंत किंवा मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित राहिली, तर विषमता वाढेल. त्यामुळे भारताला मजबूत डेटा सेंटर्स, वेगवान इंटरनेट आणि पुरेशी कॉम्प्युटिंग क्षमता विकसित करावी लागेल, जेणेकरून एआयचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकेल.
आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देताना पिचाई म्हणाले, जेव्हा मी चेन्नईहून आयआयटी खरगपूरला जाण्यासाठी कोरोमंडल एक्स्प्रेसने विशाखापट्टणममधून जायचो, तेव्हा ते एक शांत सागरी शहर होते. आज त्याच शहरात गुगल एक फुल स्टॅक एआय हब स्थापित करत आहे. हे हब गिगावॅट स्तरावरील कॉम्प्युटिंग क्षमता आणि नवीन आंतरराष्ट्रीय सागरी केबल गेटवेशी जोडलेले असेल. विशाखापट्टणम हे जागतिक एआय केंद्र बनेल, अशी कल्पनाही तेव्हा केली नव्हती, असे त्यांनी नमूद केले. भारत आणि अमेरिकेदरम्यान सागरी केबल टाकण्यात येणार आहे. त्यामुळे डिजिटल सहकार्य मजबूत होईल, असा विश्वासही पिचाई यांनी व्यक्त केला.
सुंदर पिचाई यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक किस्सा शेअर केला. त्यांचे वडील त्यांना एकदा म्हणाले होते की, जर ड्रायव्हरलेस कार (विनाचालक कार) भारतातील गजबजलेल्या रस्त्यांवर यशस्वीपणे धावू लागल्या, तरच मी खऱ्या अर्थाने प्रभावित होईन. यावर पिचाई यांनी हसत उत्तर दिले, त्यावर अजूनही काम सुरू आहे.
पिचाई यांनी अल्फाफोल्ड सारख्या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला, ज्याने दशकांपासून चाललेल्या प्रोटीन रिसर्चच्या कामाला एका खुल्या डेटाबेसमध्ये रूपांतरित केले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी एआय आधारित हवामान अंदाजाच्या सुविधेचेही त्यांनी कौतुक केले. एआय अब्जावधी लोकांचे जीवन सुधारू शकते. परंतु त्याचा विकास जबाबदारीने आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून होणे