Gold Price High  Pudhari Photo
राष्ट्रीय

Diwali Season Gold Price : धनत्रयोदशीच्या तोंडावर सोनं १ लाख ३० हजारांच्या पार; GST मेकिंग चार्जेसनंतर खिसा किती होणार ढिला?

Anirudha Sankpal

Diwali Season Gold Price :

काही दिवसातच दिवाळी सुरू होत आहे. दिवाळीत धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकं सोनं खरेदी करतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्या चांदीचे दर वाढत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचा १० ग्रॅमचा दर हा १ लाख ३० हजाराच्या पार पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात सोन्याच्या दरात जवळपास ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला १० ग्रॅम सोन्याचा दर हा ७८ हजार ६१० रूपये इतका होता. २०२५ च्या पहिल्या दहा महिन्यातच सोन्याच्या दरामध्ये तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे.

भारतीयांच्या दृष्टीनं यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशीला चढ्या दरानंच सोने खरेदी करावी लागणार आहे. फक्त वाढणारा सोन्याचा दरच नाही तर त्याच्यावर असलेला ३ टक्के जीएसटी हा देखील भारतीयांसाठी खिसा रिकामा करणारा ठरणार आहे.

याचा अर्थ दिवाळीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी फक्त १ लाख ३० हजार नाही तर जीएसटी पकडून १ लाख ३३ हजर ९०० रूपये मोजावे लागणार आहे. त्यात मेकिंग चार्जेसचं गणित जोडलं तर सोने खरेदीचं बील जवळपास १ लाख ४२ हजारांपर्यंत पोहचतं. मेकिंग चार्जेस हे ज्वेलरी स्टोअर्सच्या अनुशंगाने असतात.

दर चढे तरी ज्वेलर्स आशावादी

जरी दिवाळीत एक तोळा सोनं खरेदी ही जवळपास दीड लाखाच्या जवळ पोहचणार असली तरी देशातील ज्वेलर्स मात्र या फेस्टिव्ह सीजनमध्ये मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल याबाबत आशावादी आहेत.

सरकारनं केलेले जीएसटी रिफॉर्म, सरकारी नोकरदारांचा वाढलेला पगार यामुळं जरी सोन्याचे दर वाढत असले तरी लोकं सोनं खरेदी करतील असा विश्वास ज्वेलर्सना आहे.

याबाबत मोतीलाल ओसवालचे गुंतवणूक तज्ज्ञ मानव मोदी म्हणाले, 'सोन्याची एकूण मागणी अजूनही चढीच असणार आहे कारण सध्या सर्वजण खरेदी करण्याच्याच मूडमध्ये आहेत. मात्र अनेकजण हे अधिक सतर्क आहेत. सोन्याचे वाढणारे दर अजून स्ट्राँग होत आहेत. त्याचे फंडामेंटल्स अजून तगडे आहेत. त्यामुळं २०२५ च्या पहिल्या १० महिन्यात जवळपास ६० टक्क्यांनी सोन्याचे दर वाढून देखील खरेदीदारांमध्ये विश्वासाचं वातावरण आहे.'

सध्या सोन्याचे दर विक्रमी पातळीच्या आसपास असल्यामुळे, ज्वेलर्स व्यावसायिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दर हमी मोफत नाणी आणि सणासुदीनुसार विशिष्ट एक्सचेंज ऑफर देत आहेत. मात्र, तज्ज्ञांनी खरेदीदारांना छुप्या दरासह सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. वाढीव घडणावळ शुल्क किंवा कमी केलेला बायबॅक दर यामुळे तुमच्या खरेदीच्या किमतीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

विक्रमी दरांवर ग्राहक काय उपाय करत आहेत?

सोन्याचे दर उच्चांकी असतानाही, बजेटमध्ये राहण्यासाठी ग्राहक विविध कल्पक मार्गांचा अवलंब करत आहेत. अनेकजण खालील गोष्टी करत आहेत:

  • जुने सोने बदलून (Exchanging Old Gold) नवीन खरेदीच्या खर्चात सूट मिळवत आहेत.

  • हलक्या वजनाचे (Lightweight) किंवा कमी कॅरेटचे (Lower-Karat) (उदा. 14K–18K) दागिने निवडत आहेत.

  • क्रेडिट कार्डवरील ईएमआय (EMI) किंवा कॅशबॅक ऑफर (Cashback Offers) वापरून पेमेंटचे विभाजन करत आहेत.

  • दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डिजिटल गोल्ड (Digital Gold) किंवा सॉव्हरीन गोल्ड बाँड्समध्ये (Sovereign Gold Bonds) गुंतवणूक करत आहेत.

विशेषतः तरुण ग्राहक त्यांच्या खरेदीचा काही भाग भरण्यासाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, डिजिटल वॉलेट्स आणि कॅशबॅक योजनांचा वापर करत आहेत. शहरी बाजारात हा ट्रेंड वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT