DIG Harcharan Singh Bhullar Arrest : CBI च्या रेडमध्ये सापडली ५ कोटींची कॅश.. मर्सिडीज.. ऑडी अन् २२ महागडी घड्याळं! IPS अधिकारी आहे का सेलिब्रेटी?

DIG Harcharan Singh Bhullar Arrest
DIG Harcharan Singh Bhullar Arrestpudhari photo
Published on
Updated on

DIG Harcharan Singh Bhullar Arrest CBI :

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पंजाबमधील रोपड रेंजचे उपमहानिरीक्षक (DIG) या पदावर कार्यरत असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी हरचरण सिंग भुल्लर (IPS Harcharan Singh Bhullar) यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली आहे. सुरुवातीला ८ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाने सुरू झालेल्या या तपासात, अधिकाऱ्याकडे ५ कोटींहून अधिक रोकड, आलिशान वाहने, दागिने आणि महागडी घड्याळे यांसारख्या मोठ्या प्रमाणात 'अघोषित' संपत्तीचा खुलासा झाला आहे.

२००९ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना आणि त्यांचा कथित मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या कृष्णा नावाच्या एका खाजगी व्यक्तीला सीबीआयने अटक केली आहे. एका स्थानिक व्यावसायिकाविरुद्धचा फौजदारी गुन्हा 'मिटवण्यासाठी' आणि महिन्याच्या हप्त्यासाठी अधिकारी मध्यस्थांमार्फत लाच मागत होता आणि स्वीकारत होता, असे सीबीआयने म्हटले आहे.

DIG Harcharan Singh Bhullar Arrest
Tejas MK1 : नाशिकमधून झेपावणार देशातलं पहिलं स्वदेशी 'तेजस एमके वन' लढाऊ विमान... राजनाथ सिंह राहणार उपस्थित

तक्रारीनंतर कारवाई

फतेहगड साहिब येथील भंगार व्यावसायिक आकाश बत्ता यांनी पाच दिवसांपूर्वी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर गुरुवारी सीबीआयने गुन्हा दाखल केला. तक्रारदाराने आरोप केला होता की, डीआयजी भुल्लर यांनी ८ लाख रुपयांची लाच आणि त्यानंतर मासिक 'तडजोडी'साठी पैसे न दिल्यास व्यवसायाशी संबंधित बनावट प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती.

भुल्लर यांनी त्यांचा साथीदार कृष्णा याच्यामार्फत पैसे देण्याची मागणी केली होती. सीबीआयच्या एफआयआरनुसार, एका intercept केलेल्या संभाषणात, कृष्णाने 'ऑगस्टचे पेमेंट दिले नाही, सप्टेंबरचे पेमेंट दिले नाही' असे म्हटल्याचा आरोप आहे.

प्राथमिक पडताळणीनंतर, सीबीआयने चंदीगडच्या सेक्टर २१ मध्ये सापळा रचला आणि यावेळी डीआयजीच्या वतीने तक्रारदाराकडून ८ लाख रुपये स्वीकारताना कृष्णाला रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर तक्रारदार आणि डीआयजी यांच्यात नियंत्रित कॉलची व्यवस्था करण्यात आली, ज्यात अधिकाऱ्याने पैसे मिळाल्याची कबुली दिली आणि दोघांनाही कार्यालयात येण्यास सांगितले. या पुराव्याच्या आधारावर सीबीआयच्या पथकाने डीआयजी भुल्लर यांना मोहाली येथील त्यांच्या कार्यालयातून अटक केली.

DIG Harcharan Singh Bhullar Arrest
US - India Trade Deal : भारत - अमेरिका ट्रेड डील दृष्टीपथात.... पियूष गोयल यांनी दिलं सुतोवाच

छापेमारीत काय काय मिळालं?

अटकेनंतर सीबीआयने भुल्लर यांच्या रोपड, मोहाली आणि चंदीगड येथील अनेक ठिकाणांवर कसून शोध घेतला. या शोधमोहिमेत मोठ्या प्रमाणात संपत्ती उघड झाली, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • सुमारे ५ कोटी रुपये रोख (मोजणी अजूनही सुरू)

  • १.५ किलो सोने आणि दागिने

  • संपत्तीचे दस्तऐवज (पंजाबमधील अनेक स्थावर मालमत्तांशी संबंधित)

  • दोन आलिशान वाहनांच्या चाव्या (मर्सिडीज आणि ऑडी)

  • २२ महागडी मनगटी घड्याळे

  • लॉकरच्या चाव्या आणि ४० लिटर आयात केलेली दारू

  • डबल बॅरल बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि एअरगनसह शस्त्रे व दारूगोळा

कथित मध्यस्थ कृष्णा याच्या घरातूनही सीबीआयने अतिरिक्त २१ लाख रुपये रोख जप्त केले आहेत.

भुल्लर यांची कारकीर्द

२००९ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भुल्लर यांनी यापूर्वी डीआयजी पटियाला रेंज, दक्षता विभागाचे सहसंचालक आणि मोहाली, संगरूर, खन्ना, होशियारपूर, फतेहगड साहिब आणि गुरदासपूर येथे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

ते पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एम एस भुल्लर यांचे पुत्र आहेत. त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजीठिया यांच्याविरुद्धच्या हाय-प्रोफाइल अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्वही केले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी डीआयजी, रोपड रेंजचा कार्यभार स्वीकारला होता.

सीबीआयचा पुढील तपास सुरू असून जप्त केलेल्या मालमत्तांच्या पूर्ण व्याप्तीचा आणि संभाव्य मनी लाँड्रिंगच्या दुव्यांचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news