Crime News pudhari
राष्ट्रीय

Crime News: दुसरीकडे लग्न ठरल्यावर गर्लफ्रेंडसोबत 'टोकाचं पाऊल' उचलण्याचा करार; तिला ॲसिड प्यायला लावून बॉयफ्रेंड झाला पसार

२३ वर्षाच्या या तरूणाचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवण्याचा प्लॅन केला होता.

Anirudha Sankpal

Crime News: भाऊगापूर गावातील एका २३ वर्षाच्या शेतकऱ्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर त्याच्या १८ वर्षाच्या गर्लफ्रेंडला टायलेट क्लिनिंग ॲसिड प्यायला लावून स्वतः तिथून पळ काढल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २३ वर्षाच्या या तरूणाचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवण्याचा प्लॅन केला होता.

नेमकं काय घडलं?

ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजता भाऊगापूर गावातील बिसलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, शेती काम करणारा बंटी कुमारने त्यांच्या मुलीला गावाच्या बाहेर बोलवून घेतलं होतं. त्यानं तिला टॉयलेट क्लिनिंग ॲसिड प्यायला लावलं. त्यानंतर ज्यावेळी त्या मुलीने त्याला देखील तसं करायला सांगितलं त्यावेळी त्याने तिथून पळ काढला.

दुसरीशी ठरलं होतं लग्न

मुलीच्या वडिलांनी आरोप केला की कुमार हा त्याचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरल्यानंतर पीडित मुलीपासून सुटका करू पाहत होता. दरम्यान, कुमार पळून गेल्यानंतर मुलगी कशीबशी रस्त्याकडे आली. तिथून जाणाऱ्या लोकांना मुलगी वेदनेने कळवळत अन् जमिनीवर लोळत असताना दिसली. त्यांनी त्वरित कुटुंबीयांना कळवलं.

त्यानंतर कुटुंबीयांनी पीडित मुलीला बिसलपूर आरोग्य केंद्रात नेलं. तिची प्रकृती बिघडू लागल्यावर डॉक्टरांनी पिलिभिट राज्य वैद्यकीय कॉलेज रूग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी सांगितलं की आता ती मुलगी आऊट ऑफ डेंजर आहे.

मुलीच्या वडिलांचा गंभीर आरोप

पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत मुलीच्या वडिलांनी कुमार हा त्यांच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र तो तिच्यापासून सुटका करून घेऊन दुसऱ्या महिलेसोबत लग्न करू इच्छित होता. त्याचा दुसऱ्या मुलीसोबत विवाह ठरला होता असा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT