FSSAI Dabur Action Pudhari
राष्ट्रीय

FSSAI Dabur Action: डाबरला FSSAIचा मोठा दणका! मध, तूपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर तात्काळ बंदीचे आदेश; कारण काय?

FSSAI Dabur Action: FSSAI ने डाबर इंडिया कंपनीला '100% Pure', '100% Natural' आणि '100% Organic' असे दावे करणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

FSSAI Dabur Action: देशातील आघाडीची FMCG कंपनी डाबर इंडियावर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मोठी कारवाई केली आहे. कंपनीने आपल्या काही खाद्यपदार्थांवर '100% प्युअर' असे लिहिले आहे. हे दावे दिशाभूल करणारे आहेत असं सांगत FSSAI ने संबंधित उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कंपनीला 15 दिवसांच्या आत 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

कोणत्या उत्पादनांवर कारवाई?

FSSAI च्या निर्देशानुसार, डाबरच्या खालील उत्पादनांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

  • ऑर्गेनिक अॅपल सायडर व्हिनेगर

  • ऑर्गेनिक मध

  • होममेड नारळाचे दूध

  • तिळाचे तेल

  • गायीचे तूप

या उत्पादनांवर '100% Natural', '100% Pure', '100% Purity Guaranteed', '100% Organic' आणि '100% Tender Coconut Water' असे दावे करण्यात आले होते.

FSSAI ने आक्षेप का घेतला?

FSSAI च्या मते, अशा प्रकारचे दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येत नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दावे Food Safety and Standards (Advertising and Claims) Regulations, 2018 चे उल्लंघन करणारे आहेत. नियामक संस्थेने स्पष्ट केले की, यापूर्वीही कंपनीला अशा दाव्यांबाबत नोटिसा देऊन ते मागे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

FSSAI ने डाबरला संबंधित सर्व उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवून 15 दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑर्गेनिक लोगोच्या वापरावरही आक्षेप

FSSAI ने आणखी एक गंभीर आक्षेप नोंदवत, डाबर हिमालयन ऑर्गेनिक अॅपल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑर्गेनिक मध या उत्पादनांवर 'जैविक भारत' (Jaivik Bharat) लोगोचा वापर नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप केला आहे.

नियामक संस्थेच्या मते, हा प्रकार Food Safety and Standards (Organic Foods) Regulations, 2017 चे उल्लंघन असून, भ्रामक जाहिरात आणि ऑर्गेनिक प्रमाणपत्राच्या अनधिकृत वापराशी संबंधित आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाचा मेसेज

FSSAI ने ग्राहकांना उत्पादनांवरील दाव्यांवर अंधविश्वास न ठेवता, लेबलवरील माहिती, प्रमाणपत्रे आणि अधिकृत मान्यतांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर डाबरकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा असून, कंपनी पुढील 15 दिवसांत FSSAI ला आपला अहवाल सादर करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT