Abhijeet Dipke: 'अभिजीत दिपकेला तातडीने अटक करा'; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारीची पोलिसांकडे लेखी तक्रार, काय घडलं?

Abhijeet Dipke Complaint: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
Faizan Ansari Abhijeet Dipke
Faizan Ansari Abhijeet Dipke Pudhari
Published on
Updated on

Abhijeet Dipke Complaint: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर झालेल्या हल्ल्यांमागे दिपके यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप करत त्यांनी दिपके यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीच्या डीसीपींकडे लेखी तक्रार

फैजान अन्सारी यांनी सांगितले की, त्यांनी दिल्ली पोलिसांच्या डीसीपी कार्यालयात अभिजीत दिपके यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आपल्यावर झालेले हल्ले दिपके यांच्या समर्थकांनी केल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. या प्रकरणात यापूर्वीच दोन गुन्हे दाखल असल्याचाही दावा त्यांनी केला.

'दिपके यांना तात्काळ अटक करा'

फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे अभिजीत दिपके यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यांनी आरोप केला की, दिपके हे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करत आहेत. तसेच, नागरिकांनी कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्ली पोलिसांचे कौतुक

यावेळी फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांचे आणि दिल्ली सरकारचे कौतुक करत, सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतल्यामुळे राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली, असे मत व्यक्त केले.

अभिजीत दिपके यांची भूमिका

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांची संघटना कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधात किंवा समर्थनासाठी काम करत नाही.

त्यांच्या मते, विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर सत्तेत कोणताही पक्ष असला तरी त्याविरोधात आवाज उठवला जाईल. मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तपासाकडे सर्वांचे लक्ष

फैजान अन्सारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिस पुढे कोणती कारवाई करतात, तसेच या आरोपांबाबत तपासातून कोणती तथ्ये समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या प्रकरणातील आरोपांचा पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news