live-in partner Murder Case
नवी दिल्ली : गुन्हेगारी आणि शिक्षण याचा थेट संबंध नसतो. मात्र मागील काही वर्षांमध्ये उच्चशिक्षितांकडून घडत असलेल्या भयंकर गुन्ह्यांमुळे हा समजच खोटा ठरत आहे. दिल्लीतील पुन्हा एकदा उच्चशिक्षण घेणार्या विद्यार्थिनीने केलेल्या भयंकर कृत्याचा पदार्फाश झाला आहे. न्यायवैज्ञानिक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच असे भयंकर कृत्य केले की पोलिसही अवाक झाले. प्रियकराच्या मृत्यूच्या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलिसांनी हा मृत्यू अपघात नसून खून असल्याचा पर्दाफाश केला आहे.
'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार,दिल्लीतील गांधी विहार परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थी रामकेश मीणा ( वय ३२) हा २१ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर अमृता चौहानसोबत राहत होता. त्याचा जळालेला अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळला. सुरुवातीला रामकेश याचा मृत्यू शॉर्ट सर्किट किंवा एअर कंडिशनरच्या स्फोटामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
सुरुवातीला रामकेश याचा मृत्यू शॉर्ट सर्किट किंवा एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र पोलिसांचा अर्धवट जळालेल्या मृतदेहावरुन संशय बळावला. यानंतर घातपाताचा संशयावरुन तपास सुरु झाला.
पोलीस तपासात स्पष्ट झाले की, बी.एससी. फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी असलेली अमृता मे 2025 पासून रामकेशबरोबर राहत होती. रामकेशने तिचे गुप्तपणे तिचे खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. तिने वारंवार विनंती करूनही ते डिलीट करण्यास नकार दिला. दोघांमधील मतभेद तीव्र झाले. संतापलेल्या अमृताने माजी प्रियकर सुमित याला याची माहिती दिली.
'फॉरेन्सिक' ज्ञानाचा वापर अमृता चौहान हिने प्रियकर रामकेशचा काटा काढण्याचा कट रचला. ती मूळची उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. रामकेशला संपविण्यासाठी तिने मुरादाबाद येथील माजी प्रियकर सुमित कश्यप (२७) आणि त्यांचा मित्र एलपीजी वितरक संदीप कुमार (२९) या दोघांची मदत घेतली.
अमृता चौहान तिच्या माजी प्रियकरासह अपार्टमेंटमध्ये पोहोचली. रामकेशचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर तूप, तेल आणि अल्कोहोल ओतले. याचवेणी दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह उघडून स्फोट घडवून आणला. रामेकशचा मृत्यू तिने अपघातासारखा भासवला. पळून जाण्यापूर्वी संशय येऊ नये म्हणून तिघांनी लोखंडी गेटमधील एका लहान छिद्रातून फ्लॅट आतून बंद केला. काही मिनिटांनंतर, स्फोट झाला. मीनाची हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि इतर सामान घेऊन तिघेही पळून गेले.
सीसीटीव्ही फुटेज आणि मृतदेहावरुन पोलिसांनी सुरु केला. दिल्ली उत्तरचे पोलीस उपायुक्त राजा बांठिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मुखवटा घातलेले पुरुष इमारतीत प्रवेश करताना दिसत होते, त्यानंतर एक महिला येत होती. पहाटे २:५७ च्या सुमारास, महिला आणिएक पुरुष निघून जाताना दिसला. काही क्षणांनंतर, अपार्टमेंटमध्ये स्फोट झाला. यामुळे घातपाताच्या संशय अधिकच पक्का झाला. यानंतर फॉरेन्सिक निष्कर्षांवरून हे स्पष्ट झाले की रामकेश याची हत्या झाली आहे. घटनेच्या वेळी अमृताच्या मोबाईल लोकेशनवरून ती गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ होती आणि तिच्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून तिचा सहभाग आणखी सिद्ध झाला. पोलिसांनी अमृता चौहानसह सुमित कश्यप आणि संदीप कुमार (२९) या तिघांना अटक केली आहे. अमृताने फॉरेन्सिक सायन्समधील पार्श्वभूमीमुळे तिने अपघाता वाटावा असा खूनाचा कट रचला. आगीची दुर्घटना भासवण्याचा तिने प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींकडून एक हार्ड डिस्क, एक ट्रॉली बॅग, मीनाचा शर्ट आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपींविरोधात खून, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.