

Uttar Pradesh Crime News
लखनौ : सहा वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या गे पार्टनच्या गुप्तांगावरच पीडित मुलीच्या वडिलांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडित मुलीचे वडील हे समलैंगिक असून त्यांच्या जोडीदारानेच हे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे.
ज्या रात्री ही घटना घडली त्यावेळी पीडित मुलीचे वडील झोपले होते. त्यांना मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला त्यानंतर त्यांना जाग आली, वडिलांनी मुलीचा रूमच्या जवळ शोधाशोध केली. त्यानंतर वडिलांना त्यांचा गे पार्टनर राम बाबू यादव हा मुलीवर बलात्कार करत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर चिडलेल्या वडिलांनी यादवला गुप्तांगावर अनेकवेळा वार केले.
दरम्यान, वडिलांनी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी राम बाबू यादवला ताब्यात घेऊन त्याला रूग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी पीडित मुलीला वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठवलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम बाबू यादव हा कामगार आहे. त्याचा जोडीदार आणि मुलीचे वडील हे स्थानिक ऑर्केस्ट्रॉमध्ये डान्सर म्हणून काम करतात. हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते एक कपल म्हणूनच ओळखले जात होते.
दुसरीकडं पीडित मुलीची आई आणि वडील हे समलैंगिकतेमुळेच विभक्त झाले होते. मुलगी काही दिवसांपूर्वीच आपल्या वडिलांकडे रहायला आली होती. पोलिसांनी सांगितलं की, 'आरोपीनं आमच्या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते हे मान्य केलं आहे.' पोलिसांनी राम बाबू यादवविरूद्ध पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.