FASTag Annual Pass Price Hiked Pudhari
राष्ट्रीय

FASTag new rules 2026: FASTag चे नियम बदलले; आता फक्त १५०० रुपयांत वार्षिक पास, कोणाला होणार फायदा?

देशभरात १३ कोटींहून अधिक FASTag जारी करण्यात आले आहेत. या नवीन तरतुदीचा उद्देश टोल प्लाझाच्या परिसरात राहणाऱ्या पात्र व्यक्तींसाठी प्रवास अधिक सोयीस्कर बनवणे हा आहे.

मोहन कारंडे

FASTag new rules 2026:

नवी दिल्ली: येत्या १ नोव्हेंबरपासून, राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझाच्या २० किलोमीटर परिघात राहणारे लोक वार्षिक सवलतीच्या 'स्थानिक पास' (लोकल पास) साठी पात्र असतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी ही घोषणा केली.

मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, महानगरपालिका किंवा स्थानिक शहर सीमांच्या बाहेर असलेल्या टोल प्लाझासाठी या वार्षिक पासचे शुल्क १,५०० रुपये असेल, तर अशा सीमांच्या आत असलेल्या टोल प्लाझासाठी हे शुल्क ३,००० रुपये असेल.

ज्यांच्याकडे वैध आणि सक्रिय FASTag आहे, अशा गैर-व्यावसायिक वाहनांचे मालक, विशिष्ट टोल प्लाझावरून प्रवास करण्यासाठी सध्याच्या मासिक पासऐवजी या नवीन वार्षिक सवलतीच्या स्थानिक पासची निवड करू शकतात. हा पास केवळ संबंधित टोल प्लाझासाठीच वैध असेल आणि तो इतर कोणत्याही ठिकाणी वापरता येणार नाही. सध्या, पात्र व्यक्ती ३६० रुपये किमतीचा मासिक पास घेतात, ज्याचा वार्षिक खर्च एकूण ४,३२० रुपये इतका होतो.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, 'क्लोज्ड युजर फी कलेक्शन सिस्टम' अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर किंवा द्रुतगती मार्गांवर असा सवलतीचा स्थानिक पास दिला जाणार नाही. तसेच, ज्या ठिकाणी प्रवाशांसाठी सर्व्हिस रोड किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे, तिथेही असे पास दिले जाणार नाहीत.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात १३ कोटींहून अधिक FASTag जारी करण्यात आले आहेत. या नवीन तरतुदीचा उद्देश टोल प्लाझाच्या परिसरात राहणाऱ्या पात्र व्यक्तींसाठी प्रवास अधिक परवडणारा आणि सोयीस्कर बनवणे हा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT