Fraud News pudhari photo
राष्ट्रीय

Fraud News: पोलीसही नाहीत सुरक्षित! ट्रॅफिक पोलिसाकडूनच हफ्ता वसुलीचा प्रयत्न, अशी झाली भांडाफोड

पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोघे विजिलांस अधिकारी असल्याचा बवाव करत होते.

Anirudha Sankpal

Fake vigilance officer arrested:

हरियाणा येथील गुरूग्राममध्ये फसवणूक आणि वसुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पाहून आता लोकं पोलीस देखील सुरक्षित नसल्याची चर्चा करू लागले आहेत. पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोघे विजिलांस अधिकारी असल्याचा बवाव करत होते. त्यांनी ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होते.

एक आरोपी नेपाळचा

पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीचं नाव हे दीपक तर दुसऱ्याचं नितीन कुमार आहे. दीपक हा चरखी दादरीचा रहिवासी आहेत तर नितीन कुमार हा नेपाळचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाच टार्गेट केलं होतं. त्यांच्याविरूद्ध तक्रार मिळाल्यानंतर त्यांना सेक्टर ४० च्या हुडा मार्केट इथून अटक करण्यात आली.

मिळालेल्या वृत्तानुसार मेफील्ड गार्डन ट्रॅफिक सिग्नल इथं एक झोनल ट्रॅफिक अधिकारी आपला ड्युटी करत होता. तक्रार दाखल करण्यात आलेले दोन आरोपी हे १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गाडीतून सिग्नलजवळ आले आणि त्यांनी आपण विजिलांस अधिकारी असल्याचं सांगत ड्युटीवर असलेल्या झोनल ट्रॅफिक अधिकाऱ्याला उचलून घेऊन गेले. ते जवळच्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहले. त्यावेळी त्यांनी ट्रॅफिक पोलिसाला तुमच्याविरूद्ध तक्रार आली आहे असं सांगितलं.

सजग पोलीस अधिकाऱ्यामुळे भांडोफोड

दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्यानं कोणत्या प्रकारची तक्रार आहे हे डिटेलमध्ये सांगा असं विचारलं. त्यावेळी आरोपींनी त्यांना नंतर व्हॉट्स अॅप कॉल करण्यास सांगितलं. त्याच रात्री व्हॉट्स अॅप कॉलवर या दोघा आरोपींनी पोलिसांना धमकी देणारा व्हिडिओ पाठवत पैशाची मागणी केली. या अधिकाऱ्याने मागणी फेटाळून लावत पोलिसात तक्रार केली.

या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली. त्यांना तांत्रिक सर्व्हेलन्स आणि खबऱ्यांच्या मदतीनं मंगळवारी या दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले. त्यांनी एनसीआरमधील वेगवेगळ्या भागात त्यांनी अशा प्रकारे ७ जणांना लुटल्याची देखील कबुली दिली.

बनावट ओळखपत्र, कार आणि व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी एक रॅकेट चावलत होते. यात ते सरकारी अधिकाऱ्यांना टार्गेट करत त्यांच्याकडून पैसे उकळण्याची धंदे करत होते.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी नितीनवर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुरूग्राममध्ये दुष्कर्म, चोरी आणि आर्म्स अॅक्टसह अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तर दीपक देखील दोन प्रकरणात आरोपी आहे. पोलिसांनी या दोघांच्या नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने पुढचा तपास सुरू केला आहे. हे दोघे खोटी ओळखपत्रे, गाडी आणि धमकीचे व्हिडिओ यांचा वापर करून पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना घाबरवून लुबाडत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT