प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari news
राष्ट्रीय

Starlink India : "हास्यास्पद दुतोंडीपणा..." : 'स्टारलिंक'वरून मस्क अंबानींच्या 'समर्थकां'वर पुन्‍हा भडकले

सलग तिसर्‍या दिवशी एक्‍स पोस्‍टच्‍या माध्‍यमातून साधला निशाणा

पुढारी वृत्तसेवा

Elon Musk vs Mukesh Ambani Starlink India : "एका बाजूला अंबानींचे समर्थक असा दावा करतात की, स्टारलिंक त्यांच्या कंपनीच्या स्वस्त इंटरनेट सेवांशी स्पर्धा करू शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला तेच लोक स्टारलिंकला एक मोठा स्पर्धक म्हणूनही रंगवतात. अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद "ढोंगी आणि हास्यास्पद" आहे," अशा शब्‍दांमध्‍ये अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी आज दि. (११ ऑक्‍टोबर) पुन्हा एकदा रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्‍यावर निशाणा साधला.

वादाची सुरुवात नेमकी केव्हा झाली?

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्यावरून मुकेश अंबानी यांची रिलायन्स आणि मस्क यांची स्टारलिंक कंपनी आमने-सामने आल्या आहेत. या संघर्षात आपली भूमिका अधिक आक्रमक करत मस्क यांनी पुन्हा एकदा आपल्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीकास्त्र सोडले आहे.७ ऑक्टोबर रोजी 'एक्स' (X) वरील एका युजरला उत्तर देताना मस्क यांनी म्हटले होते की, "दुर्दैवाने, भारतीय जनतेवर आपली मक्तेदारी कायम राखण्यासाठी काही अब्जाधीश उद्योगपती आम्हाला रोखत आहेत. ते कोण आहेत याचा तुम्ही अंदाज लावू शकता... हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आहे!".

यामुळे अंबानींचा नफा कदाचित कमी होऊ शकेल...

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्यावरून मुकेश अंबानी यांची रिलायन्स आणि मस्क यांची स्टारलिंक कंपनी आमने-सामने आल्या आहेत. भारतात आपली सॅटेलाइट इंटरनेट सेवा 'स्टारलिंक' (Starlink) सुरू करण्याच्या मुद्द्यावरून मस्‍क यांनी आज केलेल्‍या एक्‍स पोस्‍टमध्‍येश म्‍हटलं की, स्टारलिंकच्या आगमनामुळे भारतातील स्पर्धा वाढेल आणि सामान्य जनतेला इंटरनेट सेवेसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. यामुळे अंबानींचा नफा कदाचित कमी होऊ शकेल, परंतु "त्यांचा व्यवसाय बंद पडणार नाही." भारतातील स्टारलिंकच्या सेवा खूप महाग असतील, तर लोक त्या खरेदी करणार नाहीत; त्यामुळे कंपनीला आपल्या सेवांचे दर परवडण्याजोगे ठेवणे भाग पडेल.

ऑनलाइन समर्थकांचे "हास्यास्पद युक्तिवाद"

मस्क यांनी अंबानींच्या ऑनलाइन समर्थकांचे "हास्यास्पद युक्तिवाद" आहेत असे सांगताना म्‍हटलं आहे की, "एका बाजूला ते दावा करतात की भारतातील अंबानींच्या जवळपास मक्तेदारी असलेल्या व्यवसायाच्या अत्यंत स्वस्त सेवांशी स्टारलिंक स्पर्धा करू शकत नाही. दुसऱ्या बाजूला, तेच लोक दावा करतात की स्टारलिंक एक तगडा स्पर्धक ठरेल. हे निव्वळ ढोंगीपणा आणि अतिशयोक्तीपूर्ण विधान आहे."

वाढत्‍या स्‍पर्धेचा फायदा भारतातील सर्वसामान्‍य जनतेला

वाढत्या स्पर्धेमुळे भारतातील सामान्य जनतेलाच फायदा होईल कारण त्यांना निवडीसाठी अधिक पर्याय मिळतील. मस्क म्हणाले, "अंबानींचा नफा कदाचित कमी होईल, पण त्यांचा व्यवसाय बंद पडणार नाही. साहजिकच, जर भारतात स्टारलिंक खूप महाग असेल, तर कोणीही ती सेवा घेणार नाही; त्यामुळे स्पेसएक्सला (SpaceX) दर परवडण्याजोगे ठेवावे लागतील."

मस्‍क यांनी शेअर केले बातम्‍यांचे स्क्रीनशॉट्स

भारतात स्टारलिंकची सॅटेलाइट ब्रॉडबँड (Satcom) सेवा सुरू करण्यास होत असलेल्या वारंवारच्या विलंबामुळे मुकेश अंबानी यांच्यावर मस्क सातत्याने टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट केली. अंबानींची कंपनी भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील एक प्रमुख कंपनींपैकी एक आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा सुरू करण्याच्या शर्यतीतही ती सहभागी आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर आपली टीका सुरूच ठेवत, मस्क यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले. या रिपोर्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अर्थपुरवठा होणाऱ्या एका कंपनीने सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणूक प्रचाराला चालना देण्यास मदत केली. रिलायन्सशी संबंधित एका संस्थेने सत्ताधारी पक्षाला मोठी राजकीय देणगी दिली.

रिलायन्सकडून अद्याप सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया नाही

मस्क यांच्या आरोपांवर रिलायन्सने अद्याप सार्वजनिकरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, देशातील दूरसंचार आणि उपग्रह सेवांना मंजुरी देण्याची कार्यपद्धती "न्याय्य आणि भेदभाव न करणारी" आहे, तसेच कोणत्याही कंपनीशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप "निराधार आणि गैरसमजावर आधारित" आहे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. याआधी, 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये मस्क यांनी अंबानींवर टीका करताना त्यांना "पंतप्रधान अंबानी" असे संबोधले होते. त्यांच्यावर मक्तेदारी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्या पोस्टमध्ये मस्क यांनी अंबानींना विचारले की, ते भारतात 'स्टारलिंक'ला (स्पर्धा करण्याची परवानगी देण्याचा विचार करतील का. असा सवालही त्‍यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT