राष्ट्रीय

Electric vehicle: इलेक्ट्रिक वाहने महागणार

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: जून महिन्याच्या सुरुवातीला आणखीही काही बदल झाले असून, फेम २ योजनेच्या अनुदान संरचनेत करण्यात आलेल्या बदलांमुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. या योजनेअंतर्गत याआधी प्रति किलोव्हॅटवर १५ हजार रुपये इतके अनुदान दिले जात असे. ते आता १० हजारांवर आले आहे. यामुळे बहुतांश इलेक्ट्रिक गाड्या २५ ते ३५ हजार रुपयांनी महाग होण्याचा अंदाज आहे.

Electric vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकार 31 मार्चच्या पुढे फास्टर अॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेइकल्स स्कीम (FAME) अंतर्गत दिलेल्या प्रोत्साहनांचा  विचार करावा असेही समितीने म्‍हटले आहे.

ईव्ही आणि जैवइंधन वाहनांचा प्रचार

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहने आणि जैवइंधन-चालित वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी यापूर्वी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशात १ एप्रिल २०२३ पासून न्यू रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) BS6 फेज-2 नियम लागू झाल्यानंतर अनेक डिझेल कार भारतातून गाशा गुंडाळला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT