Election Commission Of India pudhari
राष्ट्रीय

Election Commission Of India: निवडणूक आयोगात जबाबदाऱ्यांमध्ये मोठा फेरबदल, वादग्रस्त सीमा खन्नांच्या कामकाजावर असणार 'देखरेख'

आयोगाने आयटी विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकारी सीमा खन्ना यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी नवी व्यवस्था देखील निर्माण केली आहे.

Anirudha Sankpal

Election Commission Of India Transfer: पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून आधीच टीकेचे धनी झालेल्या निवडणूक आयोगाच्या कामकाजात आता मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. डेप्युटी इलेक्शन कमिश्नर (DEC) आणि महानिर्देशकांच्या (DG) यांच्यातील जबाबदाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. आयोगाने आयटी विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकारी सीमा खन्ना यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी नवी व्यवस्था देखील निर्माण केली आहे.

मनीष गर्ग यांच्याकडे इव्हीएमची जबाबदारी

याचबरोबर वरिष्ठ डेप्युटी इलेक्शन कमिश्नर मनीष गर्ग यांच्याकडील काही जबाबदाऱ्या या दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे आता इव्हीएम संदर्भातील जबाबदारी असणार आहे. नवीन डेप्युटी इलेक्शन कमिश्नर प्रकाश राजपुरोहित यांच्या नियुक्तीनंतर हे बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत आता वरिष्ठ डेप्युटी इलेक्शन कमिश्नर पवन कुमार शर्मा आयटी, आईसीटी आणि तक्रार निवारणासंदर्भातील विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

नवीन कार्यभाराचे आदेश जारी

निवडणूक आयोगाने ४ नोव्हेबर रोजी नवीन कार्यभाराचे आदेश जारी केले. या अंतर्गत महानिदेशक सीमा खन्ना आता वरिष्ठ डेप्युटी इलेक्शन कमिश्नर पवन कुमार शर्मा यांच्या देखरेखीखाली काम करणार आहे. तर डेप्युटी इलेक्शन कमिश्नर प्रकाश राजपुरोहित यांना निवडणूक योजनांसंबंधीच्या कामात मनीष गर्ग हे मदत करणार आहेत. निवडणूक आयोगातील अंतर्गत असहमती आणि अधिकाऱ्यांना काम विभागून देण्याबाबतच्या सतत वाद आणि सतत चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता हे मोठे बदल करण्यात आले आहेत.

खन्नांना कुणाला पाठवावी लागणार फाईल?

निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार आयटी महानिदेशक सीमा खन्ना यांना आपल्या विभागाशी निगडीत फाईल्स या आता वरिष्ठ डेप्युटी इलेक्शन कमिश्नर पवन कुमार शर्मा यांच्याकडे पाठवल्या जातील. त्यांच्याकडे आयटी. आईसीटी, तक्रार आणि नागरिक तक्रार निवारण व्यवस्थेशी संबंधित विभागांची जबाबदारी असणार आहे.

सीमा खन्ना हे नाव या विभागाच्या वादाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ज्यात निवडणूक आयोगाच्या डिजीटल वोटर लीस्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे केंद्रीकरण आणि सॉफ्टवेअरमध्ये लावण्यात आलेल्या फिल्टरवरून प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांच्यावर आरोप होता की राज्यातील अधिकाऱ्यांची मतदार यादीपर्यंतची पोहोच मर्यादित करण्यात आली होती.

पवन शर्मांकडे ३ झोनची जबाबदारी

नव्या आदेशानुसार आता पवन कुमार शर्मा फक्त आयटी आणि आयसीटी नाही तर राजकीय दलांच्या, निवडणूक खर्च धोरण, पर्यवेक्षक विभाग आणि समन्वय याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे नॉर्थ - २, इस्ट -२, साऊथ - २ झोनचा देखील प्रभार असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT