Jammu Kashmir earthquake file photo
राष्ट्रीय

Jammu Kashmir earthquake: जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचा मोठा धक्का; पाकिस्तानमध्येही बसले हादरे, पाहा थरारक व्हिडिओ

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला आज, सोमवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला.

मोहन कारंडे

Jammu Kashmir earthquake

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला आज, सोमवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी हा भूकंप झाला.

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि खोली

भूकंपाचा केंद्रबिंदू बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण भागात होता. जमिनीच्या आत साधारण १० किलोमीटर खोलीवर हालचाली झाल्यामुळे हे धक्के जाणवले. हा परिसर श्रीनगरच्या पश्चिमेला आणि गुलमर्गच्या जवळ आहे. या भूकंपाचे धक्के केवळ खोऱ्यातच नव्हे, तर भारत आणि पाकिस्तानच्या काही सीमावर्ती भागांतही जाणवले.

या भागातही जाणवले धक्के

भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ८४ किमी अंतरावर असलेल्या पहलगाम आणि सुमारे १६४ किमी अंतरावर असलेल्या कारगिलपर्यंतच्या भागात सौम्य धक्के बसल्याचे समजते. पहाटेच्या वेळी जेव्हा अनेक लोक झोपेत होते, तेव्हा अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सोशल मीडियावर काही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सुमारे ३० सेकंद जमीन हादरत असल्याचे आणि वस्तू पडताना दिसत आहेत. भूकंपाच्या वेळी काही ठिकाणी जमिनीतून गूढ आवाज आल्याचेही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT