सावधान! रेल्वेची चेन ओढण्याचा विचारही करू नका.. होऊ शकते तुरुंगवारी file photo
राष्ट्रीय

सावधान! रेल्वेची चेन ओढण्याचा विचारही करू नका.. होऊ शकते तुरुंगवारी

कोणत्या डब्यातून चेन ओढली हे कसं समजतं? ट्रेनची चेन केंव्हा ओढायला असते परवानगी?

पुढारी वृत्तसेवा

Don't even think about pulling the railway chain.. it could lead to imprisonment

पुढारी ऑनलाईन :

आग लागणे, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, गुन्हेगारी घटना किंवा चढताना-उतरताना झालेला अपघात अशा गंभीर प्रसंगांसाठीच अलार्म चेनची सुविधा दिली जाते. मात्र अनेक प्रवासी उशीर झाल्यामुळे किंवा मध्येच उतरायचे असल्याने विनाकारण चेन ओढतात. यामुळे केवळ संबंधित ट्रेन उशिरा होत नाही, तर तिच्यामागे येणाऱ्या एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं आणि हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात यावर्षी ट्रेनची चेन ओढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. आकडेवारीनुसार, 2026 च्या पहिल्या चार महिन्यांतच आतापर्यंत 1483 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 2025 मध्ये ही संख्या 5180 होती. रेल्वेने इशारा दिला आहे की, अलार्म चेन पुलिंग (ACP) चा गैरवापर केल्यास रेल्वे कायद्याच्या कलम 141 अंतर्गत एक वर्षाची शिक्षा, 1000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापराची परवानगी

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, अलार्म चेनची सुविधा केवळ आग, वैद्यकीय आणीबाणी, गुन्हेगारी घटना किंवा चढताना-उतरताना झालेल्या अपघातासारख्या गंभीर परिस्थितीतच वापरता येते. परंतु अनेक प्रवासी ट्रेन उशिरा आल्यामुळे किंवा मध्येच उतरायचे असल्याने चेन ओढतात. त्यामुळे केवळ ती ट्रेन लेट होत नाही, तर मागील अनेक गाड्यांचं वेळापत्रकही विस्कळीत होतं.

कोणत्या शहरांत सर्वाधिक प्रकार?

दिल्ली विभागाने अशा मार्गांची आणि स्थानकांची ओळख पटवली आहे, जिथे चेन पुलिंगच्या घटना सर्वाधिक घडतात. त्यानुसार गाझियाबाद, गुरुग्राम, नवी दिल्ली, पानिपत आणि रोहतक येथे सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. दिल्ली-मुजफ्फरनगर आणि नवी दिल्ली-कुरुक्षेत्र हे रेल्वे मार्ग या समस्येमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, कोणतीही अडचण असल्यास चेन ओढण्याऐवजी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर संपर्क साधावा किंवा ड्युटीवरील टीटीईशी बोलावे.

लोको पायलट तीन वेळा हॉर्न वाजवून ट्रेन थांबवतो

ट्रेनमधील चेन मुख्य ब्रेक पाइपशी जोडलेली असते. या पाइपमध्ये हवेचा दाब कायम ठेवला जातो. मात्र चेन ओढल्यावर हवा बाहेर पडते आणि दाब कमी झाल्याने ट्रेनचा वेग मंदावतो. त्यानंतर लोको पायलट तीन वेळा हॉर्न वाजवून ट्रेन थांबवतो.

कोणत्या डब्यातून चेन ओढली हे कसं समजतं?

ट्रेनच्या डब्यांमध्ये इमर्जन्सी फ्लॅशर बसवलेले असतात. त्यावरून कोणत्या डब्यातून चेन ओढण्यात आली हे समजते. जर फ्लॅशर नसतील, तर गार्डला प्रत्यक्ष जाऊन कोणत्या कोचमधील व्हॉल्व्ह काढण्यात आला आहे हे तपासावे लागते. त्यानंतर रेल्वे पोलीस विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर कारवाई करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT