Cyber Crime Crackdown
नवी दिल्ली : डिजिटल अरेस्ट आणि गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाने सायबर गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर'ने (I4C) सायबर गुन्हेगारांविरुद्ध व्यापक 'डिजिटल स्ट्राईक' सुरू केला असून, २०२५ च्या सुरुवातीपासून सायबर विभागाने फसवणुकीसाठी वापरले जाणारे ३,९६२ 'स्काईप' आयडी आणि ८३,८६७ व्हॉट्सॲप (WhatsApp) खाती ब्लॉक केली आहेत.
दूरसंचार विभाग (DoT), पोलीस दल आणि टेलिकॉम कंपन्यांच्या समन्वयाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत गुन्हेगारांच्या डिजिटल जाळ्याचा नायनाट करण्यात आला आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) प्रणालीद्वारे ओळख पटवून आतापर्यंत ८.४५ लाख सिम कार्ड आणि २.३९ लाख मोबाईलचे IMEI क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ८३,८६७ व्हॉट्सॲप अकाउंट्स, ३,९६२ स्काईप आयडी , ८.४५ लाख सिम कार्ड, २.३९ लाखमोबाईल IMEI , ८२७ फसवणूक करणारे ॲप्स ब्लॉक केले आहेत.
दूरसंचार मंत्रालयाने ८२७ धोकादायक मोबाईल ॲप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत. तसेच, 'सहयोग' पोर्टलच्या मदतीने १.११ लाखांहून अधिक संशयास्पद ऑनलाईन मजकूर हटवण्यात आला आहे.