Dharmendra Pradhan On GenZ pudhari
राष्ट्रीय

Dharmendra Pradhan On GenZ: मी पुन्हा येणार... गेल्या १० वर्षात २० कोटी मुले जन्मली... राजीनामा देणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांची मोठी वक्तव्ये

Anirudha Sankpal

Dharmendra Pradhan On GenZ: नीट पेपर लीग प्रकरणी कॉक्रोज जनता पार्टीने तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरूद्ध मोठं आंदोलन केलं होतं. आधी राजीनामा सोडून बोला असं म्हणणाऱ्या सरकारला धर्मेंद प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागाला. राजीनाम्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा धर्मेंद्र प्रधान हे संसदेत आले त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

सरकारमधील काही नेत्यांकडून देशविघातक शक्तींपासून देशाला वाचवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा त्याग केला असे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे उघडे पडू लागल्यावर सारवा सारव करण्यात आली. आता धर्मेंद्र प्रधान यांनी जेन झींबाबत मोठ मोठी वक्तव्ये करून पलटी मारली आहे.

१० वर्षात २० कोटी मुले जन्मली

भाजपचे वरिष्ठ नेते आणि संबलपूरचे खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी भुवनेश्वरच्या जीएम विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी राजीनामा का दिला याबाबत पहिल्यांदाच सार्वजनिक वक्तव्य केलं.

ते म्हणाले, 'जेन झी ही आपलीच मुले आहेत. त्यांची कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात दर वर्षी कमीत कमी २ कोटी मुलं जन्माला येतात. गेल्या दहा वर्षात २० कोटी मुले जन्माला आली आहेत. त्यांच्या काही महत्वकांक्षा आहेत. ते सर्व भारताला विश्व गुरू बनवणार. माझ्या दृष्टीने पद महत्वाचे नाही.'

मी पुन्हा येणार...

देश पातळीवर विरोध झाल्यानंतर आता माजी शिक्षण मंत्री प्रधान यांना त्यांच्या राज्यात देखील विरोधाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक पक्ष बीजेडीच्या कार्यकर्त्यांनी जवळपास सर्व कार्यक्रमात प्रधान यांचा विरोध करणं सुरू केलं आहे. रायराखोल मधील अशाच एका कार्यक्रमात प्रधान यांच्याविरूद्ध बीजेडीच्या कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजी केली.

याला प्रत्युत्तर देताना प्रधान यांनी 'या घोषणांनी मी व्यथित होत नाही. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही मला परत जायला सांगत आहात मात्र मी परत जाणार नाही मी पुन्हा येणार.' असे वक्तव्य केलं. त्याचबरोबर नवीन पटनायक हे युवकांना त्यांच्याविरूद्ध भडकवत आहेत असा देखील आरोप केला. त्यांनी मी कधीही लोकांना माझी लाज वाटेल असं काम केलेलं नाही असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT