NEET परीक्षा पेपरफुटी आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोटाळा प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (दि. ६) दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टीच्या' निदर्शनास प्रारंभ झाला.  Pudhari
राष्ट्रीय

Cockroach Janata Party Protest | 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' : जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार!

अभिजित दिपकेंसह हजारो आंदोलकांचा सहभाग, सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

पुढारी वृत्तसेवा

Cockroach Janata Party Protest : NEET परीक्षा पेपरफुटी आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोटाळा प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (दि. ६) दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टीच्या' निदर्शनास प्रारंभ झाला. "शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!" अशा घोषणांनी आज जंतर-मंतरचा परिसर दणाणून गेला.

निदर्शनात हजारो आंदोलक सहभागी

या आंदोलनात देशभरातून आलेले हजारो आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि तरुणांची संख्या मोठी होती. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि या गैरप्रकाराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकही आपल्या पाल्यांसह या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे आहेत.

अभिजीत दिपके थेट विमानतळावरून आंदोलनात सहभागी

या आंदोलनाची हाक 'कॉकरोच जनता पार्टीचे' संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली होती. ते आज सकाळीच अमेरिकेहून दिल्लीत परतले. ते विमानतळावरून थेट जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. परीक्षांमधील या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, केंद्र सरकारने आणि शिक्षणमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

झुरळेही घाबरत नाहीत आणि ती कधी मरतही नाहीत : अभिजीत दिपके

"देशातील तरुण आता घाबरणार नाहीत, ते लढा देतील. झुरळेही घाबरत नाहीत आणि ती कधी मरतही नाहीत," असे अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतर येथील आंदोलकांना संबोधित करताना म्हटले.

अभिजीत दीपके यांचे शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन

आंदोलनात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी समर्थकांना हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आदराचे प्रतीक म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना फुले देण्याचेही सुचवले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला असून, अभिजीत दीपके यांना अटक झाल्यास आपण सहा आठवड्यांचे उपोषण करू, असे त्यांनी जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT