मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काही दिवसांपासून मुंबईतिल ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी अनेक अजरामर भूमिका केल्या. यामध्ये शोले मधील जय - विरु ही अमिताभ बच्चन व धर्मेंद यांची भूमिका आजही रसिकाच्या काळजावर कोरली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार वयोमानानुसार श्वासोच्छवासाची तक्रार आल्यावर त्यांच्या कुंटूंबियांनी त्यांना ब्रिच कँडी या रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना व्हेटींलेटर लावण्यात आला होता. डॉक्टरांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरु केले.
त्यांचे नाव पूर्ण नाव धर्मेन्द्रसिंह देओल (Dharmendra Singh Deol) असे होते. त्यांचा जन्म: ८ डिसेंबर १९३५ ब्रिटीशकाळात नसराली, पंजाब याठिकाणी झाला होता.त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल, तसेच दुसरी पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या आहेत.
१९६५ ते १९८० पर्यंत धर्मेंद्र यांनी सिनेसृ्ष्टीवर राज्य केलं
आखें, शिखर, आया सावन जूम के, मेरा गांव मेरा देश, सीता ओर गीता, यादों की बारात, धर्म वीर, दोस्त …. अशा असंख्य सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात धरम पाजी यांची सर्वोच्च जागा निर्माण केली.
त्यांनतर १९७५ साली आला एक सिनेमा ज्यांनी संपूर्ण सिनेसृ्ष्टीचे जग बदलून गेलं ते सिनेमा म्हणजेचं शोले … या सिनेमाची दिला धरम पाजी यांना त्यांची लाडकी व्यक्तिरेखा म्हणजेचं विरूची … बसंती - विरू , जय वीरू या जोड्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या .. एवढंच नाही तर हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीच सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा सिनेमा ठरला …
दरम्यान आज दुपारी त्यांच्या प्रकृतीबद्दल देओल परिवाराने महत्त्वाची अपडेट दिली होती यामध्ये काही दिवसांपासून ते अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली होती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. लेटेस्ट अपडेटनुसार, धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
सोशल मिडीयावर सक्रिय
धर्मेंद हे जरी 89 वर्षांचे झाले तरी ते अजूनही ॲक्टीव्ह होते. उतारवयात त्यांनी आपला वेळ त्यांच्या लोण्यावळा फार्महाऊस वर घालवत होते. तेथील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असत. त्यांचा एक वेगळा असा चाहतावर्ग होता. पण आज त्यांनी आपल्यातून निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.