Meta smart glasses pudhari
राष्ट्रीय

Meta smart glasses: स्मार्ट ग्लासेसने कॅफेमध्ये छुपं Video रेकॉर्डिंग; कायदेशीर नोटीसनंतर आता मेटा, इन्स्टा अडचणीत?

खान मार्केटच्या कॅफेमध्ये स्मार्ट ग्लासेसने छुपं रेकॉर्डिंग... तरूणाने धाडली थेट कायदेशीर नोटीस; मेटा इन्स्टा अडचणीत?

Anirudha Sankpal

Ray-Ban Meta smart glasses privacy India: दिल्लीतील एका तरूणाने मेटा आणि इन्स्टाग्राम क्रेएटरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दिल्लीच्या या तरूणाने रे बॅनचा स्मार्ट सनग्लासेस वापरून माझे छुपे शुटिंग घेतल्याचा आरोप केला आहे. इन्स्टाग्राम क्रिएटरने रे बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस घालून काढलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

२६ जुलै रोजी हे रील इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामची मालकी ही मेटाकडे आहे. ज्यावेळी संबंधित तरूणाने इन्स्टाग्रामवर हा कथित व्हिडिओ रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याला हा व्हिडिओ कोणतेही कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन करत नाहीये असं सांगण्यात आलं.

आता या दिल्लीतील तरूणाला डिजीटल राईट्स ऑर्गनाईजेशन इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने कायदेशीर सहाय्यता पुरवली आहे. त्यांनी हे स्मार्ट ग्लासेस तयार करणारी कंपनी जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. याबाबत अजून मेटाने आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

दिल्लीतील या तरूणाच्या तक्रारीनंतर भारतात स्मार्ट ग्लासेस उत्पादन करणारी कंपन्यावर जबाबदारी निश्चितीबाबतची पहिली कायदेशीर लढाऊ सुरू झाली आहे. या कायदेशीर नोटिशीत या तरूणाने त्याचे दिल्लीच्या खान मार्केट कॅफेमध्ये गुप्तपणे शुटिंग घेण्यात आलं. याबाबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर गेल्या १० दिवसात ४.१९ लाख लोकांनी पाहिला आहे. या पोस्टखाली अनेक चुकीच्या कमेंट देखील पडल्या आहेत.

द इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने सांगितलं की या व्यक्तीने इन्स्टाग्रावर हा व्हिडिओ रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा व्हिडिओ कोणत्याही विशिष्ठ प्रायव्हसीचे उल्लंघन करत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर या तरूणाने मेटाच्या ग्रेव्हअन्स ऑफिसर ऑफ इंडियाकडे देखील तक्रार केली. मात्र त्याला तिथं देखील कोणतं ठोस उत्तर मिळालं नाही.

अखेर इन्स्टाग्रामने २८ जुलै आणि ३० जुलै रोजी या तरूणाला संपर्क केला. त्यात त्यांनी हा व्हिडिओ कोणतीही कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन करत नाहीये असं सांगितलं.

यानंतर मेटाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून या तरूणाने हा व्हिडिओ काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच इन्स्टाग्राम क्रएटरने माफी देखील मागावी अशी मागणी केली आहे. तरूणाने २.०५ कोटी रूपये नुकसान भपराई देखील मागितली आहे.

मेटा स्मार्ट ग्लासेसमध्ये एक छोटा लाईट इंडिकेटर आहे. ज्यावेळी व्हिडिओ शूट होत असतो त्यावेळी हा इंडिकेटर चालू होता. तसेत फोटो काढताना फ्लॅश देखील चालू होता. असं असलं तरी कायदेशीर नोटीशीत बाजूला असलेला रेकॉर्डिंग इंडिकेटर हा पुरेसा नाही अन् त्याकडे कोणाचं लक्ष जात नाही असं म्हणण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT